नेपोटिज्मवरून Kangana Ranaut चा बदलला सूर, म्हणाली - एकता कपूर नव्हती बुली गॅंगचा भाग...
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2022 13:06 IST2022-02-19T13:04:35+5:302022-02-19T13:06:51+5:30
Kangana Ranaut : आता 'क्वीन' कंगना नेपोटिज्म या मुद्द्यावरून जरा नरमलेली दिसते. तिचं मत बदललं आहे. एकता कपूरच्या 'लॉक अप' शोसोबत जुळल्यानंतर तिचे विचार बदलले आहे.

नेपोटिज्मवरून Kangana Ranaut चा बदलला सूर, म्हणाली - एकता कपूर नव्हती बुली गॅंगचा भाग...
सुशांत सिंह राजपूतच्या निधनानंतर कंगना रणौत (Kangana Ranaut) ही पहिली अशी अभिनेत्री होती जी बॉलिवूड इंडस्ट्रीतील नेपेटिज्मवर बिनधास्तपणे बोलली होती. इतकंच नाही तर करण जोहरपासून ते हृतिक रोशनपर्यंत सर्वांनाच तिने निशाण्यावर घेतलं होतं. पण आता 'क्वीन' कंगना या मुद्द्यावरून जरा नरमलेली दिसते. तिचं मत बदललं आहे. एकता कपूरच्या 'लॉक अप' शोसोबत जुळल्यानंतर तिचे विचार बदलले आहे.
कंगनाने सुशांतच्या मृत्यूनंतर बॉलिवूड इंडस्ट्रीतील भेदभाव, नेपोटिज्मवर वाद सुरू केला होता. पण आता कंगना नेपोटिज्मबाबत काही समस्या नाही. नुकताच तिचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. ज्यात ती म्हणत आहे की, नेपोटिज्मशी तिला कधी काही समस्या नव्हती.
कंगनाचा एक व्हिडीओ तिच्या एका फॅन पेजवर शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. एका मुलाखती दरम्यान कंगना म्हणाली की, 'मला नेपोटिज्मपासून कधी काही समस्या नव्हती. समस्या मला आउटसाइडर्ससाठी गॅंग बनवण्यापासून आहे. जे नेपोटिज्ममुळे होतं. या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. जर तुम्ही तुमचं काम करत असाल, तर काही समस्या नाही. पण समस्या तेव्हा होते जेव्हा हे आउटसायडर्स आहेत आणि हे इथे नसले पाहिजे. कारण ही आपल्या आजोबांची जागा आहे. एकता कपूर कधी बुली गॅंगचा भाग नव्हती'.
दरम्यान, कंगना लवकरच ओटीटीवर डेब्यू करत आहे. कंगना एकता कपूरचा शो 'लॉक अप' मध्ये दिसणार आहे. हा शो २७ फेब्रुवारीला ओटीटी प्लॅटफॉर्म एमएक्स प्लेअर आणि ऑल्ट बालाजीवर स्ट्रीम होणार आहे. शोमध्ये १६ वादग्रस्त स्पर्धक लॉक अपमध्ये बंद राहतील. या शोची तुलना बिग बॉससोबत केली जात आहे.