म्हणूनच मी या इंडस्ट्रीला गटार म्हणते...; कंगना राणौतची पुन्हा सटकली

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 21, 2021 11:09 IST2021-07-21T11:05:46+5:302021-07-21T11:09:24+5:30

अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्रा याला पॉर्न फिल्म प्रकरणी अटक झाली आणि इंडस्ट्रीत खळबळ माजली. आता या प्रकरणावर कंगना राणौत बोलणार नाही, असे कसे शक्य आहे?

Kangana Ranaut reacts to Raj Kundra arrest says All that glitters is not gold | म्हणूनच मी या इंडस्ट्रीला गटार म्हणते...; कंगना राणौतची पुन्हा सटकली

म्हणूनच मी या इंडस्ट्रीला गटार म्हणते...; कंगना राणौतची पुन्हा सटकली

ठळक मुद्दे राज कुंद्राला सोमवारी रात्री अटक झाली. कोर्टाने त्याला 23 जुलैपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. 

अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्रा ( Raj Kundra) याला पॉर्न फिल्म प्रकरणी अटक झाली आणि इंडस्ट्रीत खळबळ माजली. आता या प्रकरणावर कंगना राणौत (Kangana Ranaut ) बोलणार नाही, असे कसे शक्य आहे? राज कुंद्राला अटक होताच कंगनाने प्रतिक्रिया दिली आहे. या प्रकरणानंतर पुन्हा एकदा कंगना भडकली आहे. (Raj Kundra arrest)
 इन्स्टास्टोरीवर कंगनाने तिची प्रतिक्रिया दिली. ‘हेच कारण आहे की, मी या इंडस्ट्रीला गटार म्हणते. प्रत्येक चकाकणारी वस्तू सोने नसते...,’अशी जळजळीत प्रतिक्रिया तिने दिली आहे. केवळ इतकेच नाही. माझ्या प्रॉडक्शनच्या ‘टीकू वेड्स शेरू’ या सिनेमात मी बॉलिवूडचा पर्दाफाश करणार आहे. इंडस्ट्रीला सक्षम मूल्यांवर आधारित व्यवस्था हवी आहे, असेही कंगनाने म्हटले आहे.


कंगना तिच्या परखड वक्तव्यांसाठी ओळखली जाते. आत्तापर्यंत इंडस्ट्रीतील बड्या बड्या लोकांशी तिने पंगा घेतला आहे. आता राज कुंद्रा आणि त्याची पत्नी शिल्पा शेट्टी हे दोघेही कंगनाच्या निशाण्यावर आले आहेत, असे म्हणायला हरकत नाही.
 राज कुंद्राला सोमवारी रात्री अटक झाली. कोर्टाने त्याला 23 जुलैपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. 
राज कुंद्रावर मोबाईल अ‍ॅपच्या माध्यमातून पॉर्न चित्रपट तयार करून विकल्याच आरोप आहे. राजविरूद्ध आपल्याकडे ठोस पुरावे असल्याचा दावा पोलिसांनी केला आहे. राजने आपल्या एका नातलगासोबत मिळून एक कंपनी सुरू केली होती. ही कंपनी पॉर्न कंटेंटसाठी अनेक एजंटला कॉन्ट्रॅक्ट द्यायची, असाही आरोप आहे. राजने त्याचा नातलग प्रदीप बख्शीसोबत मिळून लंडनमध्ये केनरिन नावाची प्रॉडक्शन कंपनी सुरू केली होती. या कंपनीचा राज कुंद्रा अध्यक्ष आहे शिवाय बिझनेस पार्टनरही आहे.  
  

Web Title: Kangana Ranaut reacts to Raj Kundra arrest says All that glitters is not gold