कंगना राणौतने हृतिक रोशनला पुन्हा डिवचले; म्हटले हात जोडून मागायला लावेल माफी !

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 30, 2017 22:24 IST2017-08-30T16:54:30+5:302017-08-30T22:24:46+5:30

कंगनानेच यावेळी हृतिकला डिवचले आहे. नुसतेच डिवचले नाही तर त्याला हात जोडून माफी मागायला भाग पाडणार असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे हृतिक कंगनाला कशा पद्धतीने उत्तर देणार हे बघणे मजेशीर ठरणार आहे.

Kangana Ranaut reacts to Hrithik Roshan again; With the help of angered apologies! | कंगना राणौतने हृतिक रोशनला पुन्हा डिवचले; म्हटले हात जोडून मागायला लावेल माफी !

कंगना राणौतने हृतिक रोशनला पुन्हा डिवचले; म्हटले हात जोडून मागायला लावेल माफी !

ही महिन्यांपूर्वी कंगना राणौत आणि हृतिक रोशन यांच्यातील वाद माध्यमांमध्ये चांगलाच गाजला होता. दोघांनीही एकमेकांवर आरोपांच्या फैरी झाडत एकमेकांचा खरा चेहरा उघड करण्याचा प्रयत्न केला होता. पुढे तर हा वाद न्यायालयापर्यंत पोहोचला होता. आता पुन्हा एकदा या वादाला तोंड फुटण्याची शक्यता असून, कंगनानेच यावेळी हृतिकला डिवचले आहे. नुसतेच डिवचले नाही तर त्याला हात जोडून माफी मागायला भाग पाडणार असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे हृतिक कंगनाला कशा पद्धतीने उत्तर देणार हे बघणे मजेशीर ठरणार आहे. 

दोघांमध्ये वाद होण्याअगोदर ‘काइट्स’ आणि ‘क्रिश-३’ या चित्रपटांमध्ये त्यांनी एकत्र काम केले आहे; मात्र हे प्रकरण तेव्हा वाढले जेव्हा कंगनाने हृतिकला ‘सिली एक्स’ असे म्हटले. काही दिवसांपूर्वीच एका इव्हेंटमध्ये कंगनाला विचारण्यात आले होते की, ‘तू हृतिक रोशनमुळे ‘आशिकी-३’ सोडला आहेस काय? यावर उत्तर देताना कंगनाने म्हटले की, ‘होय, मीदेखील अशाप्रकारच्या अफवा ऐकल्या आहेत. मला नाही माहीत की, माझा सिली एक्स पार्टनर्स पब्लिसिटीसाठी अशाप्रकारच्या अफवा का पसरवितो? माझ्यासाठी आता तो चॅप्टर क्लोज झाला आहे. तसेच मी पुन्हा जुन्या गोष्टी उकरून काढू इच्छित नाही.’

कंगनाच्या या आरोपाला उत्तर देताना हृतिकनेही कंगनाला जशास तसे उत्तर दिले होते. त्यानंतर कंगना आणि हृतिकमध्ये ब्लेम गेमला सुरुवात झाली. काही दिवसांसाठी दोघांमधील हा वाद खूपच विकोपाला गेला होता. त्यानंतर इंडस्ट्रीमधील काही मंडळींनी मध्यस्थी करून हा वाद मिटविला; मात्र असे वाटत आहे की, कंगना तिच्या सिली एक्सला एवढ्या सहजासहजी सोडू इच्छित नाही. पुन्हा एकदा तिने हृतिकला जाहीरपणे डिवचले आहे. नुकतीच कंगना वरिष्ठ पत्रकार रजत शर्मा यांच्या ‘आप की अदालत’ या कार्यक्रमात सहभागी झाली होती. याठिकाणी तिने जाहीरपणे म्हटले की, ‘हृतिकला मी फक्त एकाच अटीवर माफ करू शकते, त्याने माझी हात जोडून माफी मागावी... बस्स!’

यावेळी हृतिकसोबतचे काही क्षण आठविताना कंगना भावुक झाल्याचे दिसून आली. ती म्हणाली की, आमच्यातील काही पर्सनल गोष्टी लिक केल्या गेल्या. ज्यामुळे मला खूप मानसिक त्रास झाला. आजही लोक त्यास गॉसिप समजून वाचत आहेत. या प्रकारामुळे माझे खच्चीकरण झाले होते. परंतु अशातही मी माघार न घेता याचा धैर्याने सामना केला. वृत्तानुसार कंगनाने हृतिकसोबतच्या अफेअरच्या बातम्यांना दुजोरा दिला होता. तिचे हृतिकबरोबर अफेअर होते, हे तिने मान्य केले होते. परंतु जेव्हा ही बाब हृतिकला कळाली तेव्हा त्याला कंगना नकोशी झाली. पुढे दोघांमध्ये वाद झाला. आता हा वाद पुन्हा नव्याने पेटणार काय? हे बघणे मजेशीर ठरेल. }}}} ">‘I want @iHrithik's apology for causing mental trauma', #KanganaRanaut told me in #AapKiAdalat Sat, Sept 2 at 10 pm @indiatvnewspic.twitter.com/6SQBW2v1po— Rajat Sharma (@RajatSharmaLive) August 30, 2017

Web Title: Kangana Ranaut reacts to Hrithik Roshan again; With the help of angered apologies!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.