उन्होने मुझे नहीं बताया तो फिर मैं खफा हूं...! रुसली ग रुसली, कंगना राणौत रुसली!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 29, 2018 09:46 IST2018-07-29T09:40:23+5:302018-07-29T09:46:33+5:30

चांगली मैत्रिण असूनही तिने आपल्याला ही गोष्ट सांगू नये, हे दु:ख कंगना राणौतला अस्वस्थ करतेय. 

kangana ranaut on priyanka chopra nick jonas engagement i am upset | उन्होने मुझे नहीं बताया तो फिर मैं खफा हूं...! रुसली ग रुसली, कंगना राणौत रुसली!!

उन्होने मुझे नहीं बताया तो फिर मैं खफा हूं...! रुसली ग रुसली, कंगना राणौत रुसली!!

प्रियांका चोप्राने सलमान खानचा ‘भारत’ सोडला आणि अचानक तिच्या साखरपुड्याची बातमी आली. प्रियांकाने आपल्या वाढदिवशीचं बॉयफ्रेन्ड निक जोनाससोत साखरपुडा केला. साहजिकचं प्रियांकाचे चाहते यामुळे आनंदित आहेत. पण इंडस्ट्रीतील एक व्यक्ति मात्र ही बातमी ऐकून खट्टू झाली आहे. प्रियांका आपली इतकी चांगली मैत्रिण असूनही तिने आपल्याला ही गोष्ट सांगू नये, हे दु:ख या व्यक्तिला अस्वस्थ करतेय. आता ही व्यक्ति कोण तर कंगना राणौत. होय, अलीकडे एक फॅशन शोदरम्यान खुद्द कंगनानेचं आपली ही भावना बोलून दाखवली.

 प्रियांका व निकच्या साखरपुड्याबद्दल काय सांगशील, असा प्रश्न तिला केला गेला, यावर ‘अच्छा, वो मेरी बहुत अच्छी दोस्त है. उन्होने मुझे नहीं बताया तो फिर मैं खफा हूं,’ असे कंगना म्हणाली.
आता कंगनाचे इंडस्ट्रीत कुणीच मित्र नाही, हे तर जगजाहीर आहे. पण कदाचित कंगना प्रियांकाला आपली चांगली मैत्रिण मानते. कंगना व प्रियांका या दोघींनी ‘फॅशन’ चित्रपटात काम केले आहे. एकेकाळी या दोघींच्या ‘कॅटफाईट’चे किस्से चर्चेत असायचे. कंगनाने त्यावेळीही प्रियांकाला चांगली मैत्रिण असल्याचे म्हटले होते. प्रियांका माझी मित्र आहे आणि ती मला कुठल्याही पत्रकारापेक्षा अधिक चांगल्या प्रकारे ओळखते, असे ती म्हणाली होती.
तूर्तास कंगना ‘मणिकर्णिका- द क्वीन आॅफ झांसी’ या चित्रपटात बिझी आहे.याशिवाय ‘मेंटल है क्या’ या चित्रपटातही ती राजकुमार रावसोबत दिसणार आहे. या दोन्ही चित्रपटांची प्रेक्षक आतुरतेने प्रतीक्षा करत आहेत.

 

Web Title: kangana ranaut on priyanka chopra nick jonas engagement i am upset