​कंगना राणौत झाली ‘कंगाल’! ‘महाग’ पडले हृतिक रोशनसोबतचे वैर!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2017 14:11 IST2017-12-18T08:41:19+5:302017-12-18T14:11:19+5:30

बॉलिवूड क्विन कंगना राणौत या वर्षांत आपल्या चित्रपटांपेक्षा वादांमुळेच अधिक चर्चेत राहिली. हृतिक रोशनसोबत तिने थेट पंगा घेतला. नेपोटिजमविरूद्ध ...

Kangana Ranaut 'poor'! Hrithik Roshan's 'Bhaag' | ​कंगना राणौत झाली ‘कंगाल’! ‘महाग’ पडले हृतिक रोशनसोबतचे वैर!!

​कंगना राणौत झाली ‘कंगाल’! ‘महाग’ पडले हृतिक रोशनसोबतचे वैर!!

लिवूड क्विन कंगना राणौत या वर्षांत आपल्या चित्रपटांपेक्षा वादांमुळेच अधिक चर्चेत राहिली. हृतिक रोशनसोबत तिने थेट पंगा घेतला. नेपोटिजमविरूद्ध तिने तोंड उघडले.पण कदाचित हृतिकसोबत पंगा घेणे आणि नेपोटिजमवर बोलणे कंगनाला बरेच महागात पडलेय. होय, या ‘लव्ह अ‍ॅण्ड वॉर’ प्रकरणाचे परिणाम आता कंगनाला दिसू लागले आहेत. या कॉन्ट्रव्हर्सीमुळे कंगनाच्या कमाईवर आणि तिला मिळत असलेल्या जाहिरातींवर सर्वाधिक परिणाम झालायं. हा आमचा निष्कर्ष नाही तर खुद्द कंगनाने याबद्दल खुलासा केला आहे. 

अलीकडे दिलेल्या एका मुलाखतीत कंगना यावर बोलली. यंदा आलेले कंगनाचे दोन्ही सिनेमे ‘सिमरन’ आणि ‘रंगून’ बॉक्सआॅफिसवर दणकून आपटले. पण कंगनाचे मानाल तर या दोन फ्लॉप सिनेमांमुळे तिची डिमांड जराही कमी झालेली नाही. पण होय, या वर्षात तिच्या कमाईवर वाईट परिणाम झालाय. जाहिराती कमी झाल्या आहेत आणि माझ्या कमाईचा ग्राफ बराच खाली आला आहे, असे कंगनाने स्वत: कबुल केले. लवकरच  स्वत:चे प्रॉडक्शन हाऊस सुरु करण्याचे माझे प्लानिंग होते. पण आता इतक्यात तरी हे शक्य वाटत नाही. अर्थात कमाई कमी झालीय, म्हणून माझी मागणी घटलीयं, असे मात्र अजिबात नाही. माझ्याकडे कामाची कमी नाही, असे कंगनाने या मुलाखतीत सांगितले. सध्या माझ्याकडे तीन चित्रपटांच्या आॅफर्स आहेत. माझे आयुष्य एक परिकथा बनून राहावे, असे मला अजिबात वाटत नाही.  याऊलट तरूण मुलींसाठी माझे आयुष्य एक प्रेरणा बनून राहावे, असे मला वाटते. त्यामुळे मी निरंतर प्रयत्न करत आहे, असेही कंगना यावेळी म्हणाली. निश्चितपणे या प्रयत्नांत कंगना स्वत:ला वादांपासून किती दूर ठेवते, ते आपण बघूच.

ALSO READ : कंगना राणौत पुन्हा बोलली! म्हणे, ‘पद्मावती’चा वाद निव्वळ ड्रामा!

कंगना राणौत तूर्तास  ‘मणिकर्णिका : द क्वीन आॅफ झांसी’ या चित्रपटाच्या शूटींगमध्ये  बिझी आहे.    अलीकडे या चित्रपटाच्या सेटवरचे राणी लक्ष्मीबाईच्या पेहरावातील कंगनाचे काही फोटो लीक झाले होते. 

Web Title: Kangana Ranaut 'poor'! Hrithik Roshan's 'Bhaag'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.