का आला कंगना रणौतचा हा हॉट अँड बोल्ड फोटो अचानक चर्चेत, हे आहे कारण

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 20, 2020 12:43 IST2020-05-20T12:41:16+5:302020-05-20T12:43:58+5:30

कंगनाच्या या हॉट अँड बोल्ड फोटोची एकेकाळी चांगलीच चर्चा रंगली होती.

kangana ranaut old picture clicked by dabboo ratnani got viral PSC | का आला कंगना रणौतचा हा हॉट अँड बोल्ड फोटो अचानक चर्चेत, हे आहे कारण

का आला कंगना रणौतचा हा हॉट अँड बोल्ड फोटो अचानक चर्चेत, हे आहे कारण

ठळक मुद्देकंगनाचा हा फोटो डब्बूच्या एका कॅलेंडरमधील असून हा फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. हा फोटो पोस्ट करून एक तास व्हायच्या आतच २३ हजार लोकांनी हा फोटो लाईक केला आहे.

कोरोनामुळे अख्खा देश लॉकडाऊन आहे आणि लॉकडाऊनच्या काळात सगळेजण आपआपल्या घरात कैद आहे. सामान्य लोकच नव्हे तर सेलिब्रेटीदेखील आपल्याच घरात असून घरातल्यांसोबत जास्तीत जास्त वेळ घालवत आहेत. तसेच सेलिब्रेटी सोशल मीडियावर देखील चांगलेच सक्रिय आहेत. सध्या सोशल मीडियावर कंगना रणौतचा एक जुना फोटो व्हायरल झाला आहे. या फोटोत आपल्याला कंगनाचा हॉट आणि बोल्ड अंदाज पाहायला मिळत आहे.

सध्या अनेक जुने फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले जात आहेत. या सगळ्यात प्रसिद्ध फोटोग्राफर डब्बू रत्नानीने कंगनाचा काही वर्षांपूर्वीचा एक फोटो पोस्ट केला आहे. कंगनाचा हा फोटो डब्बूच्या एका कॅलेंडरमधील असून हा फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. हा फोटो पोस्ट करून एक तास व्हायच्या आतच २३ हजार लोकांनी हा फोटो लाईक केला आहे. कंगनाचा हा हॉट आणि बोल्ड अंदाज तिच्या चाहत्यांना प्रचंड आवडत आहे. सामान्यांसोबतच सेलिब्रेटी देखील या फोटोवर कमेंट करत आहेत. हा फोटो खूपच चांगल्याप्रकारे काढण्यात आला होता असे सिद्धांत कपूरने कमेंट केले आहे. 

डब्बू रत्नानीने नुकतेच बॉलिवूडमध्ये त्याचे २५ वर्षं पूर्ण केले आहेत. त्यामुळे तो २५ ईयरस ऑफ डब्बू रत्नानी या हॅशटॅगखाली तो त्याने काढलेले अनेक फोटो पोस्ट करत आहे. त्याने काही दिवसांपूर्वी विद्या बालन, अर्जुन रामपाल, शिल्पा शेट्टी यांचे देखील जुने फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले होते. 

Web Title: kangana ranaut old picture clicked by dabboo ratnani got viral PSC