"पुष्पा ३ मध्ये कंगना रणौतला कास्ट केलं पाहिजे कारण...", श्रेयस तळपदे असं का म्हणाला?

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 15, 2024 13:36 IST2024-08-15T13:34:25+5:302024-08-15T13:36:33+5:30

श्रेयस तळपदे कंगना रणौत दिग्दर्शित आगामी इमर्जन्सी सिनेमात अटलबिहारी वाजपेयींची भूमिका साकारणार आहे. त्यानिमित्ताने मीडियाशी संवाद साधताना श्रेयसने हे विधान केलं (shreyas talpade)

Kangana Ranaut in Pushpa 3 shreyas talpade talk in emergency movie press conference | "पुष्पा ३ मध्ये कंगना रणौतला कास्ट केलं पाहिजे कारण...", श्रेयस तळपदे असं का म्हणाला?

"पुष्पा ३ मध्ये कंगना रणौतला कास्ट केलं पाहिजे कारण...", श्रेयस तळपदे असं का म्हणाला?

काल कंगना रणौतच्या आगामी 'इमर्जन्सी' सिनेमाचा ट्रेलर लॉंच झाला. कंगना या सिनेमात भारताच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधींची व्यक्तिरेखा साकारत आहे. या सिनेमाच्या ट्रेलरमध्ये कंगनाचा लूक तिचे हावभाव पाहून ती हुबेहूब इंदिरा गांधी असल्याचं सर्वांना जाणवत आहे. या सिनेमात अभिनेता श्रेयस तळपदे अटलबिहारी वाजपेयींची भूमिका साकारत आहे. ट्रेलर लॉंचच्या वेळी श्रेयसने कंगनाविषयी एक इच्छा व्यक्त केली. कंगनाला 'पुष्पा' सिनेमात कास्ट करण्याबद्दल श्रेयस असं काय म्हणाला की स्वतः कंगनालाही हसू फुटलं.

पुष्पा ३ निघाला तर त्यात कंगना असावी: श्रेयस

'इमर्जन्सी' सिनेमाच्या प्रेस कॉन्फरन्सवेळी मीडियाशी संवाद साधताना श्रेयसने एक किस्सा सांगितला. तो म्हणाला, "मी इमर्जन्सी शूटींगवेळी सेटवर एका सीनची रिहर्सल करत होतो. पुढे कॅमेरासमोर मी काहीतरी वेगळं ट्राय केलं. तेव्हा कंगनाने माझ्या कानात येऊन सांगितलं की, तुम्ही जे रिहर्सलला केलंय तेच करा. कंगना सेटवर मल्टिटास्क करते. ती एकाच वेळी अनेक गोष्टी करते. त्यामुळे यापुढे पुष्पा ३ बनला तर मी मेकर्सना सांगेन की, कंगनाला जरुर त्यामध्ये कास्ट करा. कारण झुकेगा नही साला."

 

श्रेयस तळपदे इमर्जन्सी सिनेमात

कंगना रणौत दिग्दर्शित 'इमर्जन्सी'  सिनेमात श्रेयस तळपदे अटलबिहारी वाजपेयींची भूमिका साकारताना दिसणार आहे. 'इमर्जन्सी'चा ट्रेलर काल रिलीज झाला. या सिनेमात कंगना इंदिरा गांधींच्या प्रमुख भूमिकेत असून तिनेच या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धूरा सांभाळली आहे. या सिनेमात अनुपम खेर, मिलिंद सोमण सुद्धा प्रमुख भूमिकेत आहेत. 'इमर्जन्सी' सिनेमा ६ सप्टेंबरला रिलीज होणार आहे. सर्वांना या सिनेमाची उत्सुकता आहे.

 

 

Web Title: Kangana Ranaut in Pushpa 3 shreyas talpade talk in emergency movie press conference