हमारे चक्कर में सडक पे मत आ जाना भाई...! दिलजीत वादात फूड डिलिव्हरी सर्व्हिसची उडी, कंगनाची सटकली

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2020 12:18 IST2020-12-18T12:08:53+5:302020-12-18T12:18:39+5:30

एक फूड डिलिव्हरी सर्व्हिस आपल्या व दिलजीतच्या भांडणात नाक खुपसतेय, म्हणल्यावर कंगनाची मात्र सटकली.

kangana ranaut has warned a food delivery service for attacking her during her twitter feud with diljit dosanjh | हमारे चक्कर में सडक पे मत आ जाना भाई...! दिलजीत वादात फूड डिलिव्हरी सर्व्हिसची उडी, कंगनाची सटकली

हमारे चक्कर में सडक पे मत आ जाना भाई...! दिलजीत वादात फूड डिलिव्हरी सर्व्हिसची उडी, कंगनाची सटकली

ठळक मुद्देअलीकडे कंगनाने दिलीजत दोसांजला लक्ष्य केले होते. आपल्या अनेक ट्विटमध्ये कंगनाने दिलजीतला डिवचत ‘दिलजीत कित्थे आ’ असे लिहिले होते.

कंगना राणौत आणि दिलजीत दोसांज यांच्यातील ‘ट्विटर वॉर’अद्याप संपलेले नाही.   शेतक-यांच्या सुरू असलेल्या आंदोलनाला पाठिंबा देणारा दिलजीत आणि या आंदोलनाला विरोध करणारी कंगना यांच्यात ट्विटरवर चांगलीच जुंपली होती. यावरून दोघांचे चाहतेही आमने-सामने मैदानात उतरले होते. इतके कमी की काय, एका फूड डिलिव्हरी सर्व्हिसनेही दिलजीत व कंगनाच्या लढाईत उतरत, लक्ष वेधून घेतले होते.
दिलजीत तर यावर काही बोलला नाही. पण एक  फूड डिलिव्हरी सर्व्हिस आपल्या व दिलजीतच्या भांडणात नाक खुपसतेय, म्हणल्यावर कंगनाची मात्र सटकली. तिने आता ट्विट करून या  फूड डिलिव्हरी सर्व्हिसला तंबी दिली आहे. आमच्या नादात तू रस्त्यावर येऊ नकोस भावा, असे कंगनाने म्हटले आहे.

हमारे चक्कर में...


कंगनाने लिहिले, ‘ही  फूड डिलिव्हरी सर्व्हिस दिलजीत दोसांज व माझ्या वादात रेफरीची भूमिका बजावताना दिसतेय. ही सर्व्हिस उघडपणे माझी खिल्ली उडवत आहेत आणि शिवाय ‘कंगना रेप्ड बाय दिलजीत’ या ट्रेंडचाही सपोर्ट करते. आम्ही एका इंडस्ट्रीत काम करतो. आज भांडू, उद्या एकत्र येऊ. तू तुझे बघ. आमच्या नादात रस्त्यावर येऊ नकोस भावा.’

तुम्हाला ठाऊक आहेच की, अलीकडे कंगनाने दिलीजत दोसांजला लक्ष्य केले होते. आपल्या अनेक ट्विटमध्ये कंगनाने दिलजीतला डिवचत ‘दिलजीत कित्थे आ’ असे लिहिले होते. याला दिलजीतने पंजाबीतच उत्तर दिले होते. यानंतर संबंधित फूड डिलिव्हरी सर्व्हिसने कंगनाला टोला लगावत एक मीम पोस्ट केले होते. नेमक्या याच मीमवरून कंगनाने या फूड डिलिव्हरी सर्व्हिसला सुनावले आहे.
  

कंगनाने विचारले दिलजीत कित्थे आ? गायकाने दिलं असं उत्तर की, पोटधरून हसत बसाल...

म्हणून लोक माझा राग करतात...! कंगना राणौतने सांगितले कारण

Web Title: kangana ranaut has warned a food delivery service for attacking her during her twitter feud with diljit dosanjh