कंगना रानौतने 'पंगा' सिनेमाचे दिल्लीतील शूटिंग केले पूर्ण

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 13, 2019 17:00 IST2019-04-13T17:00:00+5:302019-04-13T17:00:00+5:30

बॉलिवूडची क्वीन कंगना रानौतने आगामी चित्रपट 'पंगा'चे दिल्लीतील चित्रीकरण पूर्ण केले असून आता पुढील चित्रीकरण कोलकातामध्ये होणार आहे.

Kangana Ranaut has completed shooting of 'Panga' in Delhi | कंगना रानौतने 'पंगा' सिनेमाचे दिल्लीतील शूटिंग केले पूर्ण

कंगना रानौतने 'पंगा' सिनेमाचे दिल्लीतील शूटिंग केले पूर्ण

बॉलिवूडची क्वीन कंगना रानौतने आगामी चित्रपट 'पंगा'चे दिल्लीतील चित्रीकरण पूर्ण केले असून आता पुढील चित्रीकरण कोलकातामध्ये होणार आहे. ही माहिती गायक व अभिनेता जस्सी गिलने सोशल मीडियावर दिली आहे. 

जस्सी गिलने इंस्टाग्रामवर 'पंगा' चित्रपटाचे चित्रीकरण संपल्याचे सांगून फोटो शेअर केला आहे. ज्यात संपूर्ण टीम आनंद साजरा करताना दिसत आहेत. या फोटो सोबत जस्सीने लिहिले की, चित्रीकरण संपले, आता चला कोलकाताला. या चित्रपटाचे आम्ही संपूर्ण भारतात चित्रीकरण करणार आहोत. 

'पंगा' हा चित्रपट कबड्डी खेळावर आधारीत आहे. या चित्रपटाच्या चित्रीकरणाचे पहिले शेड्युल भोपाळमध्ये ६ डिसेंबरला पूर्ण झाले आहे. 'पंगा'मध्ये कंगना राणौत एका कबड्डी खेळाडूच्या भूमिकेत दिसणार आहे. कंगनाशिवाय अभिनेत्री नीना गुप्ता आणि पंजाबी अभिनेता जस्सी गिल यात महत्त्वपूर्ण भूमिकेत आहे़. हा चित्रपट पुढील वर्षी रिलीज होणार आहे. आता त्यापूर्वी ‘पंगा’च्या सेटवर काय काय घडामोडी घडतात, ते पाहणे इंटरेस्टिंग असणार आहे.


'पंगा' चित्रपटाची दिग्दर्शिका अश्विनी अय्यर तिवारी म्हणाली की, 'या चित्रपटात कंगना रानौतची बॉडी डबल वापरायची नव्हती. त्यामुळे कंगनाला ट्रेनिंग घ्यायला सांगितले. तर कंगना रानौतदेखील कबड्डी खेळ खूप एन्जॉय करते आहे. यापूर्वी ती कधीच कबड्डी खेळलेली नाही आणि तिच्यासाठी हा खेळ नवादेखील नाही. त्यामुळे तिला या खेळातील बारकावे समजायला कोणताच त्रास होत नाही.'

Web Title: Kangana Ranaut has completed shooting of 'Panga' in Delhi