"मी नाही तर कोण?" अमिताभ बच्चन यांच्याशी तुलना केल्यानंतर ट्रोल झालेली कंगना पुन्हा बरळली

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2024 15:33 IST2024-05-07T15:32:47+5:302024-05-07T15:33:39+5:30

प्रचारसभेत बोलताना कंगनाने स्वत:ची तुलनी बिग बी अमिताभ बच्चन यांच्यासोबत केली होती. त्यामुळे कंगनाला प्रचंड ट्रोल करण्यात आलं होतं. आता पुन्हा कंगनाने ट्रोलिंगला उत्तर देण्यासाठी वक्तव्य केलं आहे. 

kangana ranaut defend her self after comparing with amitabh bachchan asked not me then who | "मी नाही तर कोण?" अमिताभ बच्चन यांच्याशी तुलना केल्यानंतर ट्रोल झालेली कंगना पुन्हा बरळली

"मी नाही तर कोण?" अमिताभ बच्चन यांच्याशी तुलना केल्यानंतर ट्रोल झालेली कंगना पुन्हा बरळली

लोकसभा निवडणुकीचं तिकीट मिळाल्यापासून बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौत चर्चेत आहे. कंगना हिमाचल प्रदेशातील मंडी येथून भाजपाच्या तिकिटावर निवडणूक लढवत आहे. लोकसभा निवडणुकीसाठी कंगना जोरदार प्रचार करताना दिसत आहे. अशाच एका प्रचारसभेत केलेल्या वक्तव्यामुळे कंगना चर्चेत आली होती. प्रचारसभेत बोलताना कंगनाने स्वत:ची तुलनी बिग बी अमिताभ बच्चन यांच्यासोबत केली होती. त्यामुळे कंगनाला प्रचंड ट्रोल करण्यात आलं होतं. आता पुन्हा कंगनाने ट्रोलिंगला उत्तर देण्यासाठी वक्तव्य केलं आहे. 

काय म्हणाली होती कंगना? 

"सध्या संपूर्ण देश चिंतेत आहे. मी तुमची कंगना प्रचारासाठी राजस्थानला जाते, पश्चिम  बंगालला जाते, मी दिल्लीला जाते अथवा  मणिपूरला... मला लोकांकडून खूप प्रेम आणि आदर मिळतोय. मी खात्रीने सांगू शकते की अमिताभ बच्चन यांच्यानंतर इंडस्ट्रीत कोणाला इतकं प्रेम आणि आदर मिळत असेल तर तो मला मिळतोयठ, असं प्रचारसभेत कंगना म्हणाली होती. या प्रचारसभेतील तिचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. 

बिग बींशी तुलना केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर कंगनाला ट्रोलिंगचा सामना करावा लागला होता. पण, त्यानंतरही कंगनाने तिच्या वक्तव्याचं समर्थन केलं आहे. "मी नव्हे तर मग कोण?" असा सवाल आता कंगनाने उपस्थित केला आहे. 

ट्रोलिंगनंतर कंगना म्हणते, "मी नव्हे तर मग कोण?" 

"संपूर्ण भारतातून मला प्रेम मिळत आहे. फक्त माझ्या अभिनयासाठी नाही तर मी महिला सक्षमीकरणासाठी केलेल्या कामामुळे माझं कौतुक होत आहे. माझ्या वक्तव्यावर आक्षेप असणाऱ्यांना माझा एक प्रश्न आहे. जर मी नाही तर हिंदी सिनेसृष्टीतील कोणाला अमिताभ बच्चन यांच्यासारखं प्रेम आणि आदर मिळाला? खान? कपूर? कोण? मला हे जाणून घ्यायचं आहे. म्हणजे मला स्वत:ला बरोबर करता येईल", असं कंगना म्हणाली आहे. 

Web Title: kangana ranaut defend her self after comparing with amitabh bachchan asked not me then who