मोरासोबत थिरकली, कैऱ्या तोडल्या... कंगना राणौतचा खास व्हिडीओ होतोय व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 12, 2025 16:58 IST2025-05-12T16:58:36+5:302025-05-12T16:58:54+5:30
कंगना हिनं एक सुंदर व्हिडीओ शेअर केलाय.

मोरासोबत थिरकली, कैऱ्या तोडल्या... कंगना राणौतचा खास व्हिडीओ होतोय व्हायरल
Kangana Ranaut Video: बॉलिवूडची क्वीन ते नेत्यापर्यंतचा प्रवास केलेली कंगना राणौत (Kangana Ranaut) नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. ती तिच्या स्पष्टवक्तेपणासाठी ओळखली जाते. भारत आणि पाकिस्तान युद्धादरम्यान आपल्या ठाम राजकीय भूमिकेमुळे चर्चेत होती. "आतंकवाद्यांनी भरलेला एक वाईट देश, त्याला जगाच्या नकाशावरून कायमचं नष्ट केलं पाहिजे" असं म्हणत तिनं पाकिस्तानवर टीका केली होती. तर काही ट्विट करत तिनं पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाचं आणि भारतीय जवानांच्या शौर्यांचं कौतुक केलं होतं. आता भारत-पाकिस्तान दरम्यान युद्धविराम झाल्यानंतर कंगना हिनं एक सुंदर व्हिडीओ शेअर केलाय. ज्यात तिनं जीवनाचा आनंद घेणं हेच सत्य असल्याचं म्हटलं.
कंगना ही सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय असते. विविध फोटो आणि व्हिडीओ ती चाहत्यांसोबत शेअर करत असते. आताही तिनं एक खास व्हिडीओ पोस्ट केलाय. ज्यामध्ये ती निसर्गाच्या सान्निध्यात मोरासोबत नाचताना, झाडावरून कैऱ्या तोडताना दिसतेय. यातून तिचा साधेपणा आणि निसर्गप्रेम दिसून आलं. कंगनाला आनंदात पाहून तिचे चाहतेही खूश झालेत. यावेळी कंगना ही साडीमध्ये अगदी सुंदर दिसत होती.
कंगनाने हा व्हिडीओ शेअर करताना लिहिलं, "जिवंत राहण्यासाठी फक्त एकच गोष्ट आवश्यक आहे आणि ती म्हणजे जीवन. मला आशा आहे की आपण केवळ जगूच नाही तर जिवंतपणा ठेवू आणि आनंदी देखील राहू". तिच्या या सकारात्मक विचारांना चाहत्यांचा भरभरून प्रतिसाद दिलाय.
कंगनाच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर ती हिमाचल प्रदेशमधील 'मंडी'ची ती खासदार आहे. सध्या ती 'मंडी'चा कारभार पाहतेय. राजकारणात आल्यानंतर कंगनाने अभिनयाकडे दुर्लक्ष केलेलं नाही. ती लवकरच एका हॉलिवूड चित्रपटात दिसणार आहे. कंगना ही 'ब्लेस्ड बी द एव्हिल' या हॉरर ड्रामामधून हॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यास सज्ज झाली आहे. कंगना या चित्रपटात मुख्य भूमिका साकारणार आहे. कंगना ही आजच्या घडीची पॉवरफुल अभिनेत्री आहे. चार राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार आणि चार फिल्मफेअर पुरस्कारांव्यतिरिक्त ती एक चित्रपट निर्मातीदेखील आहे.