कंगना राणौतनं अभिनेत्यांना म्हटलं 'उद्धट', म्हणाली- 'मला खूप अडचणींना तोंड द्यावं लागलं...'

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 15, 2025 16:49 IST2025-08-15T16:49:09+5:302025-08-15T16:49:49+5:30

Kangana Ranaut : बॉलिवूडची क्वीन म्हणजेच अभिनेत्री कंगना राणौत तिच्या स्पष्टवक्त्या शैलीसाठी ओळखली जाते. चित्रपटांपासून राजकारणापर्यंत प्रत्येक मुद्द्यावर ती बेधडकपणे आपले मत मांडते.

Kangana Ranaut called the actors 'rude', said- 'I had to face a lot of difficulties...' | कंगना राणौतनं अभिनेत्यांना म्हटलं 'उद्धट', म्हणाली- 'मला खूप अडचणींना तोंड द्यावं लागलं...'

कंगना राणौतनं अभिनेत्यांना म्हटलं 'उद्धट', म्हणाली- 'मला खूप अडचणींना तोंड द्यावं लागलं...'

बॉलिवूडची क्वीन म्हणजेच अभिनेत्री कंगना राणौत (Kangana Ranaut ) तिच्या स्पष्टवक्त्या शैलीसाठी ओळखली जाते. चित्रपटांपासून राजकारणापर्यंत प्रत्येक मुद्द्यावर ती बेधडकपणे आपले मत मांडते. यावेळी कंगनाने बॉलिवूडमधील पुरुष कलाकारांवर निशाणा साधला आहे. तिने पुरुष कलाकारांना उद्धट म्हटले आहे. कंगना अलिकडेच एका मुलाखतीत बॉलिवूडमधील अभिनेत्यांबद्दल बोलली.

कंगना राणौतने हॉटरफ्लायला दिलेल्या मुलाखतीत पुरुष कलाकारांबद्दल सांगितले. तिने सांगितले की, ती मुद्दाम बहुतेक कलाकारांसोबत काम करत नाही कारण ते सेटवर चांगले वागत नाहीत. तसेच, यामुळे तिच्या समस्या वाढल्या आहेत. कंगना म्हणाली की, ''मी फक्त सेक्सुअल पद्धतीने बोलत नाहीये. सेटवर उशीरा येणे, गैरवर्तन करणे, नायिकेचा अपमान करणे, तिला बाजूला करणे, तिला छोटी व्हॅन देणे अशा मलाही खूप अडचणी आल्या आहेत. माझ्यावर इतके खटले दाखल झाले कारण मी त्याच्याशी सहमत नव्हते तर बहुतेक मुली त्यांच्याशी सहमत होत्या. त्यामुळे त्यांना वाटले की ही इतकी अहंकारी का आहे.''
कंगना राणौत आता चित्रपटांमध्ये कमी दिसते आणि ती राजकारणात जास्त सक्रिय झाली आहे. ती सोशल मीडियावर सामाजिक कार्याचे फोटो शेअर करत राहते. ती सतत विधाने करत राहते ज्यामुळे ती अडचणीत येते.

जया बच्चन यांच्यावर कंगनाने साधला निशाणा
अलिकडेच जया बच्चन यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. ज्यामध्ये त्या एका पुरूषाला ढकलताना आणि त्यांच्यासोबत सेल्फी घेण्याचा प्रयत्न करणाऱ्यावर रागावताना दिसत आहेत. कंगना राणौतने जया बच्चन यांच्या या व्हिडीओवर प्रतिक्रिया दिली आहे. तिने लिहिले की, "ती एक अतिशय बिघडलेली आणि विशेषाधिकारप्राप्त महिला आहे. लोक तिचा राग आणि मूर्खपणा सहन करतात कारण ती अमिताभ बच्चन यांची पत्नी आहे. ही समाजवादी टोपी कोंबड्याच्या कंगव्यासारखी दिसते, तर त्या कोंबड्यासारख्या दिसतात. किती अपमानजनक आणि लज्जास्पद गोष्ट आहे."

Web Title: Kangana Ranaut called the actors 'rude', said- 'I had to face a lot of difficulties...'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.