म्हणे,‘पापा की परी’ फ्लॉप होणार ; कंगनाने पुन्हा एकदा आलिया भटवर काढली भडास
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2022 14:59 IST2022-02-20T14:57:56+5:302022-02-20T14:59:36+5:30
Gangubai Kathiawadi : आलियाचा ‘गंगूबाई काठियावाडी’ हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येतोय. याच चित्रपटाच्या निमित्ताने कंगनाने आलियावर तिखट शब्दांत टीका केली आहे.

म्हणे,‘पापा की परी’ फ्लॉप होणार ; कंगनाने पुन्हा एकदा आलिया भटवर काढली भडास
आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत राहणारी अभिनेत्री कंगना राणौत (Kangana Ranaut) हिने पुन्हा एकदा आलिया भटला (Alia Bhatt)अप्रत्यक्ष लक्ष्य केलं आहे. आलियाचा ‘गंगूबाई काठियावाडी’ (Gangubai Kathiawadi) हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येतोय. याच चित्रपटाच्या निमित्ताने कंगनाने आलियावर तिखट शब्दांत टीका केली आहे. हा सिनेमा दणकून आपटणार आहे. कारण लीड रोलसाठी अभिनेत्रीची निवडच चुकलीये, अशा शब्दांत कंगनाने आलियाचं नाव न घेता म्हटलंय.
200 कोटी खाक होणार...!
इन्स्टास्टोरीवर कंगनाने पोस्ट केली आहे. ती यात लिहिते,‘या शुक्रवारी बॉक्स बॉक्स ऑफिसवर 200 कोटी खाक होणार. एक पापा (मुव्ही माफिया डॅडी) की परी (जिच्याकडे ब्रिटीश पासपोर्ट आहे) रॉमकॉग बिंबो अॅक्टिंगही करू शकते, हे पापाला सिद्ध करायचं आहे. या चित्रपटातील सर्वात मोठी चूक म्हणजे, कास्टिंगच चुकलंय. पण हे नाहीच सुधारणार. अशात प्रेक्षक साऊथ व हॉलिवूड सिनेमाकडे वळत असतील तर आश्चर्य वाटायला नको. जोपर्यंत मुव्ही माफिया पॉवरमध्ये आहेत, तोपर्यंत बॉलिवूडच्या नशीबात हेच असणार’, असं पहिल्या स्टोरीत कंगनाने लिहिलं आहे.
लोकांनी यांना पाहणं बंद केलं पाहिजे...
दुसऱ्या स्टोरीमध्ये ती लिहिते, ‘बॉलिवूड माफिया डॅडी पापा ज्याने एकट्यानेच फिल्म इंडस्ट्रीची संस्कृती बदलवून ठेवली. त्याने अनेक बड्या दिग्दर्शकांसोबत चतुराईने गेम खेळत सुमार प्रॉडक्टला त्यांच्या माथी मारलं. या चित्रपटाच्या रिलीजनंतर याचं आणखी एक उदाहरण समोर येईल. लोकांनी यांना पाहणं बंद केलं पाहिजे. या शुक्रवारी एक मोठा हिरो आणि एक महान दिग्दर्शक त्याच्या डावपेचाला बळी पडलेले असतील.’
तुम्हाला ठाऊक आहेच की, ‘गंगूबाई काठियावाडी’ हा सिनेमा बॉलिवूडचे महान दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांनी दिग्दर्शित केला आहे. यात अजय देवगणही महत्त्वपूर्ण भूमिकेत आहे. यात आलिया भट गंगूबाई काठियावाडीची भूमिका साकारताना दिसणार आहे.