कंगना रानौतने पुन्हा एकदा हृतिक रोशनवर साधला निशाणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2019 15:52 IST2019-03-04T15:49:46+5:302019-03-04T15:52:16+5:30

बॉलिवूडची क्वीन म्हणजेच अभिनेत्री कंगना रानौत 'मणिकर्णिका' चित्रपटामुळे चर्चेत आली होती. याशिवाय रोखठोक भूमिकेमुळे ती नेहमीच चर्चेत असते. आतादेखील ती हृतिक रोशनवर भडकून केलेल्या वक्तव्यामुळे चर्चेत आली आहे.

Kangana Ranaut again once again hit Hrithik Roshan | कंगना रानौतने पुन्हा एकदा हृतिक रोशनवर साधला निशाणा

कंगना रानौतने पुन्हा एकदा हृतिक रोशनवर साधला निशाणा

बॉलिवूडची क्वीन म्हणजेच अभिनेत्री कंगना रानौत 'मणिकर्णिका' चित्रपटामुळे चर्चेत आली होती. याशिवाय रोखठोक भूमिकेमुळे ती नेहमीच चर्चेत असते. आतादेखील ती हृतिक रोशनवर भडकून केलेल्या वक्तव्यामुळे चर्चेत आली आहे. तिने त्याचे नाव न घेता त्याच्यावर निशाणा साधला आहे.

कंगना रानौत म्हणाली की, 'ज्याच्यासोबत मी दोन चित्रपटात काम केले आहे. तरीदेखील तो व्यक्ती मला ओळखत नाही. माझ्यासोबत दोन चित्रपटासाठी पाच वर्ष काम केल्यानंतरही त्याचे म्हणणे आहे की मला ओळखत नाही. मला माहित आहे की हे कसे होऊ शकते. पहिल्यांदा अनुराग बसूचा चित्रपट 'काइट्स'साठी दोन वर्ष काम केले. त्यानंतर 'क्रिश ३'साठी तीन वर्ष एकत्र काम केले. तरीदेखील तो म्हणतो की मला ओळखत नाही. हा निव्वळ मुर्खपणा आहे. '
कंगनाला पत्रकारांनी विचारले की जर भविष्यात तुमची भेट झाली तर त्यावर कंगनाने सांगितले की,' मी जिथे असेन तिथे तो येणार नाही.'


कंगनाने तिला कोणत्याही मोठ्या स्टार्सची गरज नसल्याचे सांगितले. ती म्हणाली की, तिला तिच्या मेहनतीमुळे यश मिळाले आहे. यादरम्यान तिने करण जोहरवर देखील टीका केली. 


कंगना रानौतचा 'मणिकर्णिका' चित्रपट काही महिन्यांपूर्वी प्रदर्शित झाला. या चित्रपटात झाशीच्या राणीची भूमिका कंगनाने साकारली होती. या चित्रपटाचे दिग्दर्शनदेखील तिने केले होते. या चित्रपटातील तिच्या कामाची खूप प्रशंसा झाली. 

Web Title: Kangana Ranaut again once again hit Hrithik Roshan