कंगणा-हृतिक भांडणाला नवे वळण : कंगणा घेतेय माघार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2016 14:01 IST2016-04-06T21:01:35+5:302016-04-06T14:01:35+5:30

गेल्या काही आठवड्यांपासून बॉलिवूडच्या दोन आघाडीच्या कलाकारांमधील भांडण चांगलेच गाजत आहे. आम्ही बोलतोय हृतिक-कंगणाबद्दल. एकमेकांवर कुरघोडी करत दोघांनी कोर्टात ...

Kangana-Hrithik: A new turn of a fight: Kangana withdrawal? | कंगणा-हृतिक भांडणाला नवे वळण : कंगणा घेतेय माघार?

कंगणा-हृतिक भांडणाला नवे वळण : कंगणा घेतेय माघार?

ल्या काही आठवड्यांपासून बॉलिवूडच्या दोन आघाडीच्या कलाकारांमधील भांडण चांगलेच गाजत आहे. आम्ही बोलतोय हृतिक-कंगणाबद्दल. एकमेकांवर कुरघोडी करत दोघांनी कोर्टात एकमेकांविरोधा कोर्टात दावे दाखल केले आहेत. दोघेही माघार घ्यायला तयार नव्हते.

परंतु आता हे प्रकरण नवे वळण घेताना दिसत आहे. आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झडत असताना कंगाणाला या सर्व गोष्टीचा उबग आला आहे. लवकरात लवकर हृतिकसोबत सुरू असलेली कायदेशीर लढाई संपुष्टात आणण्याची तिची इच्छा आहे. मग आता प्रश्न पडतो की,कंगणाने माघार घेण्याचा निर्णय का घेतला?

तर कारण असे आहे की, कंगणा सध्या रिलेशनशिपमध्ये आहे. तिचा बॉयफ्रेंड बॉलिवूड इंडस्ट्रीमधील नसून दोघांचे प्रेम सध्या जोरावर आहे. या भांडणामुळे तिच्या रिलेशनशिपवर परिणाम होऊ  नये म्हणून तिने दोन पाऊल मागे येण्याचा निर्णय घेतला आहे. परंतु हृतिक इतक्या सहजासहजी सगळे विसरण्याच्या मूडमध्ये दिसत नाही. कंगणाने जाहीरपणे त्याची माफी मागावी अशी त्याने मागणी केली आहे. आता पुढे काय होते हे लवकरच कळेल.

Web Title: Kangana-Hrithik: A new turn of a fight: Kangana withdrawal?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.