वेदिका कुमार की तो निकल पडी, बॉलिवूड पदार्पणाआधीच तिच्या 'कंचना ३'चा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 27, 2019 20:05 IST2019-04-27T20:05:00+5:302019-04-27T20:05:00+5:30
अभिनेत्री वेदिका कुमारने मल्याळम, कन्नड, तमीळ व तेलगू या सिनेइंडस्ट्रीत आपल्या अभिनय कौशल्याने रसिकांना भुरळ पाडून त्यांच्या मनात आपले स्थान निर्माण केले आहे आणि आता ती बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यासाठी सज्ज झाली आहे.

वेदिका कुमार की तो निकल पडी, बॉलिवूड पदार्पणाआधीच तिच्या 'कंचना ३'चा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ
अभिनेत्री वेदिका कुमारने मल्याळम, कन्नड, तमीळ व तेलगू या सिनेइंडस्ट्रीत आपल्या अभिनय कौशल्याने रसिकांना भुरळ पाडून त्यांच्या मनात आपले स्थान निर्माण केले आहे आणि आता ती बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यासाठी सज्ज झाली आहे. ती बॉलिवूडमध्ये इमरान हाश्मीसोबत झळकणार आहे. यापूर्वी तिचा नुकताच तमीळ चित्रपट 'कंचना ३' प्रदर्शित झाला. या चित्रपटाला प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळतो आहे.
तमीळ हॉरर कॉमेडी चित्रपट 'मुनी : कंचना' या चित्रपटाच्या सीरिजमधील तिसरा भाग नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला. हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर सहा दिवसांत या चित्रपटाने शंभर कोटींची कमाई केली.
आता या चित्रपटाचा हिंदी रिमेक बनत असून त्यात अक्षय कुमार व कियारा आडवाणी मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.
वेदिका कुमारने दाक्षिणात्य सिनेइंडस्ट्रीत आपल्या अभिनय कौशल्याच्या जोरावर स्थान मिळवले. त्यानंतर आता ती बॉलिवूडमध्ये एन्ट्री करण्यासाठी सज्ज झाली आहे. वेदिका इमरान हाश्मीसोबत जीथू जोसेफच्या चित्रपटात झळकणार आहे. अद्याप या चित्रपटाचे शीर्षक ठरलेले नाही.
याबाबत वेदिका सांगते की,' माझ्यावर आणि माझ्या चित्रपटांवर प्रेक्षक इतके प्रेम करतात, त्यामुळे स्वतःला मी भाग्यवान समजते. त्यांनी कंचना ३ चित्रपटाला दिलेल्या प्रतिसादासाठी त्यांची मी आभारी आहे. तसेच मी बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यासाठी खूप उत्सुक आहे. इमरान हाश्मी आणि माझ्या या चित्रपटावर देखील तुम्ही असेच प्रेम कराल, अशी आशा आहे. '
वेदिका कुमार व इमरान हाश्मी या जोडीला रुपेरी पडद्यावर पाहणे औत्सुकतेचे ठरणार आहे.