कमल हासनचा सवाल; कामचुकार आमदारांना वेतन का द्यावे?
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 16, 2017 16:05 IST2017-09-16T10:35:21+5:302017-09-16T16:05:21+5:30
अभिनेता तथा दिग्दर्शक कमल हासन सध्या राजकारणात येण्यासाठी पूर्ण तयारी करताना दिसून येत आहेत. कारण दररोज त्यांच्याकडून राजकारण्यांवर हल्लाबोल ...

कमल हासनचा सवाल; कामचुकार आमदारांना वेतन का द्यावे?
अ िनेता तथा दिग्दर्शक कमल हासन सध्या राजकारणात येण्यासाठी पूर्ण तयारी करताना दिसून येत आहेत. कारण दररोज त्यांच्याकडून राजकारण्यांवर हल्लाबोल केला जात आहे. काही दिवसांपूर्वीच त्यांनी स्वत:चा पक्ष काढणार असल्याचे घोषित केले होते. आता त्यांनी आमदार-खासदारांच्या पगारावर हल्लाबोल केला आहे. त्यांनी म्हटले की, रिसॉर्टमध्ये बसून जनतेच्या पैशांवर मौज करणाºया आमदार-खासदारांचा चेहरा जनतेसमोर आणायला हवा. यावेळी कमल यांनी, ‘लोकप्रतिनिधींना ‘काम नाही, तर वेतन नाही’ ही नीती का लागू होत नाही?’ असा सवालही उपस्थित केला.
पुढे बोलताना कमलने म्हटले की, तामिळनाडू सरकारने आंदोलन करणाºया शिक्षक आणि अन्य कर्मचाºयांचे त्या दिवसाचे वेतन कापणार असल्याचे जाहीर केले. कारण त्यांनी त्या दिवशी काम केले नाही असा सरकारने निर्वाळा दिला. मग हाच निकष आमदार-खासदारांना का लागू होत नाही? हे लोक काम करीत नसतील तर त्यांना पगार दिला जाऊ नये, अशी सरकारने नीती अवलंबवायला हवी. सूत्रानुसार कमल हासन स्वत:चा राजकीय पक्ष काढणार असून, आगामी काळात तामिळनाडूमध्ये होणाºया सार्वत्रिक निवडणुकांमध्ये ते उतरण्याची शक्यता आहे.
ALSO READ : कमल हासन काढणार स्वत:चा राजकीय पक्ष; भगवा सोडून कुठलाही रंग स्वीकारण्यास तयार!
द क्विंटमध्ये दिलेल्या मुलाखतीनुसार कमल हासनने म्हटले की, ‘मी स्वत:चा राजकीय पक्ष काढण्याचा विचार करीत आहे. कारण सद्यस्थितीत असलेला एकही पक्ष माझ्या विचारांशी साम्य साधणारा नाही. कमल हासन यांना नेहमीच विविध पक्षांचे राजकीय नेते भेटण्यासाठी जात असतात. त्यावरून ते कोणत्या पक्षात प्रवेश करतील यावर जोरदार चर्चा रंगत आहे. दरम्यान, आता स्वत:च ते पक्ष काढणार असल्याने तामिळनाडूचे राजकारण ढवळून निघण्याची शक्यता आहे.
काही दिवसांपूर्वी त्यांनी संघ आणि भाजपाविषयी केलेले वक्तव्य खूपच चर्चेत राहिले होते. त्यांनी म्हटले होते की, भगवा सोडून कुठल्याही रंग स्वीकारण्यास तयार आहे.’ तसेच सुपरस्टार रजनीकांतही सध्या राजकारणात येणार असल्याची चर्चा आहे.