‘Vikram’च्या कमाईच्या पैशातून काय करणार कमल हासन, त्यांनीच दिलं उत्तर...
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 15, 2022 13:50 IST2022-06-15T13:41:11+5:302022-06-15T13:50:00+5:30
Kamal Haasan On Vikram Collection : ‘विक्रम’ला मिळालेल्या या अभूतपूर्व यशामुळे कमल हासन सध्या जाम खूश्श आहेत. आता त्यांनी यावर आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे. ‘विक्रम’ या चित्रपटाद्वारे झालेली कोट्यावधी रूपयांची कमाई कुठे कुठे आणि कशी खर्च करणार, हे त्यांनी सांगितलं आहे.

‘Vikram’च्या कमाईच्या पैशातून काय करणार कमल हासन, त्यांनीच दिलं उत्तर...
साऊथचे मेगास्टार कमल हासन (Kamal Haasan ) यांच्या ‘विक्रम’ ( Vikram ) या सिनेमानं बॉक्स ऑफिसवरधुमाकूळ घाला आहे. केवळ 11 दिवसांत या चित्रपटाने वर्ल्डवाईड 322 कोटींचा गल्ला जमवला. एकट्या भारतात या चित्रपटाने 220 कोटींपेक्षा अधिक कमाई केली. ‘विक्रम’ला मिळालेल्या या अभूतपूर्व यशामुळे कमल हासन सध्या जाम खूश्श आहेत. आता त्यांनी यावर आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे. ‘विक्रम’ या चित्रपटाद्वारे झालेली कोट्यावधी रूपयांची कमाई कुठे कुठे आणि कशी खर्च करणार, हेही त्यांनी सांगितलं.
अलीकडे एका प्रेस मीटमध्ये ते म्हणाले, ‘सगळ्यांची प्रगती हवी असेल तर पैशाची चिंता न करणारा लीडर हवा. मी एका झटक्यात 300 कोटी कमवू शकतो, असं मी म्हणायचो, तेव्हा मी बाता मारतोय, असं लोकांना वाटायचं. मी नैराश्यातून बोलतोय, संतापातून बोलतोय, असं लोक म्हणायचे. पण तुम्ही पाहू शकतात. विक्रमची कमाई तुमच्या डोळ्यांसमोर आहे,’असं ते म्हणाले.
आता मी माझी सगळी कर्ज फेडणार...
आता मी माझी सगळी कर्ज फेडू शकतो. आता मी मन भरून खाणार आणि माझ्या कुटुंबासाठी व मित्रांसाठी शक्य ते सगळं करणार. आता मला दुसºयाकडून पैसे घेऊन कुणाच्या मदतीचं नाटक करावं लागणार नाही. मला कुठलाही मोठा खिताब नकोय. मला फक्त एक चांगला माणूस व्हायचं आहे, असंही कमल हासन म्हणाले.
150 कोटी बजेटमध्ये बनलेल्या ‘विक्रम’मध्ये कमल हासन लीड रोलमध्ये आहेत. त्यांनी 4 वर्षानंतर या चित्रपटाद्वारे कमबॅक केलं आहे. तेच या चित्रपटाचे निर्माते आहेत. त्यांच्याशिवाय विजय सेतुपती, फहाद फासिल यांच्याही यात मुख्य भूमिका आहेत. शिवाय सुपरस्टार सूर्याचा कॅमिओ आहे. लोकेश कनगराज यांनी ही चित्रपट दिग्दर्शित केला आहे.
या चित्रपटाने 11 दिवसांत भारतातील सर्व भारतीय भाषांमध्ये 220.75 कोटींची कमाई केली आहे. त्याच वेळी जगभरात 322.15 कोटी रुपयांचा बिझनेस केला आहे.