KRK Bail : जामीन मिळाल्यानंतरही केआरकेचा मुक्काम तुरुंगात?, वाचा यामागचं नेमकं कारण

By ऑनलाइन लोकमत | Published: September 7, 2022 11:01 AM2022-09-07T11:01:53+5:302022-09-07T11:02:52+5:30

Kamaal R Khan: वादग्रस्त ट्विट केल्याप्रकरणी केआरकेला 30 ऑगस्ट रोजी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून अटक करण्यात आली होती.

Kamaal R Khan gets bail in molestation case still will remain in jail for controversial tweets | KRK Bail : जामीन मिळाल्यानंतरही केआरकेचा मुक्काम तुरुंगात?, वाचा यामागचं नेमकं कारण

KRK Bail : जामीन मिळाल्यानंतरही केआरकेचा मुक्काम तुरुंगात?, वाचा यामागचं नेमकं कारण

googlenewsNext

KRK Bail : कमाल खानला उर्फ केआरके (KRK)ला २०२१मधील  विनयभंगाच्या एका प्रकरणात स्थानिक न्यायालयाने जामीन मंजूर केला. उपनगर वर्सोवा पोलिसांनी अभिनेत्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पण जामीन मिळूनही, कमाल खान सध्या तुरुंगातच राहणार आहे कारण अभिनेता अक्षय कुमार आणि चित्रपट निर्माते राम गोपाल वर्मा यांच्या विरोधात केलेल्या वादग्रस्त ट्विटशी संबंधित 2020 चा खटला बोरिवली दंडाधिकारी न्यायालयात प्रलंबित आहे.

कोणत्या कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला
केआरके विरोधात भारतीय दंड संहितेच्या कलम १५३ (दंगल घडवण्याच्या उद्देशाने प्रवृत्त करणे) आणि ५०० (मानहानीची शिक्षा) आणि माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या तरतुदींनुसार FIR नोंदवण्यात आली आहे. केआरके ट्विटरवर बॉलिवूड सेलिब्रिटींवर निशाणा साधतं असतो. विशेषत: स्टारकिड्सबद्दल केलेल्या ट्विटमध्ये केआरकेने अनेकवेळा मर्यादा ओलांडल्या आहेत. 

वादग्रस्त ट्विट केल्याप्रकरणी केआरकेला 30 ऑगस्ट रोजी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून अटक करण्यात आली होती. बोरिवली न्यायदंडाधिकारी न्यायालयाने नंतर त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली. रविवारी वर्सोवा पोलिसांनी विनयभंग प्रकरणी त्याला ताब्यात घेऊन वांद्रे न्यायालयात हजर केले.

वकील अशोक सरोगी आणि जय यादव यांच्यामार्फत वांद्रे दंडाधिकारी न्यायालयात दाखल केलेल्या जामीन अर्जात कमाल खानने दावा केला की, एफआयआरमध्ये नोंदवलेली माहिती कथित विनयभंगाच्या घटनेशी जुळत नाही. या घटनेच्या १८ महिन्यांनंतर FIR दाखल करण्यात आली आणि पीडितेच्या मैत्रिणीनेही तिला तसे करण्यास सांगितले असल्याचे वकील यादव यांनी न्यायालयासमोर सादर केले. त्यांनी पुढे असा युक्तिवाद केला आहे की कमाल खान याच्याविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या ज्या कलमांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे ते सर्व जामीनपात्र आहेत. .
 

Web Title: Kamaal R Khan gets bail in molestation case still will remain in jail for controversial tweets

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.