कल्कि कोल्चिनने मुलीसोबतचा फोटो केला शेअर, मदरहूड करते एन्जॉय,पाहा हे क्युट फोटो
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 30, 2020 19:34 IST2020-06-30T19:31:00+5:302020-06-30T19:34:54+5:30
कल्किने 9 महिने आपला गरोदरपणा खऱ्या अर्थाने एन्जॉय केला असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. ती नेहमी आपल्या बेबी बंप फ्लॉन्ट करताना दिसून आली. एवढचं नाहीतर तिने आपल्या बेबी बंबसोबत स्टायलिश फोटोशूटही केलं होतं.

कल्कि कोल्चिनने मुलीसोबतचा फोटो केला शेअर, मदरहूड करते एन्जॉय,पाहा हे क्युट फोटो
लग्नाआधीच कल्की आई झाली. कल्कीने मुलीचे नाव ‘साफो’ ठेवले आहे. नुकतीच तिने इन्स्टाग्रामवर मुलीचा फोटो शेअर केला आहे. सध्या ती मातृत्व पूर्णपणे एन्जॉय करताना दिसत आहे. मायलेकीचं नातं काही वेगळंच असतं. आपल्या पोटच्या गोळ्यावर आईचं जीवापाड प्रेम असतं. आपल्या लेकरापासून ही माऊली जरा वेळही दूर राहू शकत नाही. मुलीसोबत फोटो पाहून चाहतेही खूप सारे लाईक्स आणि कमेंटसचा वर्षाव करत आहेत. गेल्या दोन वर्षांपासून कल्कि गाय हर्शबर्ग या आपल्या प्रियकरासोबत लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत होती.दोघांनी अद्याप लग्न केलेले नाही.
कल्किने 9 महिने आपला गरोदरपणा खऱ्या अर्थाने एन्जॉय केला असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. ती नेहमी आपल्या बेबी बंप फ्लॉन्ट करताना दिसून आली. एवढचं नाहीतर तिने आपल्या बेबी बंबसोबत स्टायलिश फोटोशूटही केलं होतं. कल्किचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. कल्किने आधीच सांगितल्याप्रमाणे वॉटर बर्थच्या माध्यामातून तिने मुलीला जन्म दिला.
2009मध्ये कल्कि 'देव डी' या चित्रपटातून दिसली होती. या चित्रपटाच्या चित्रिकरणादरम्यान कल्कि दिग्दर्शक अनुराग कश्यप यांच्या प्रेमात पडली होती. त्यानंतर दोघांनी लग्नही केलं होतं. पण कल्कि आणि अनुरागचं हे नातं फार काळ टिकलं नाही. दोघांनी 2015मध्ये घटस्फोट घेतला. पण त्यांच्यातील मैत्री तुटली नाही. हेदोघे आजही एकमेकांचे चांगले मित्र आहेत.