'कलंक'चे नवे पोस्टर आऊट, माधुरी दीक्षितवर खिळतील तुमच्या नजरा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 16, 2019 16:48 IST2019-03-16T16:39:52+5:302019-03-16T16:48:04+5:30

कलंक सिनेमा त्याच्या घोषणेपासूनच या ना त्याकारणामुळे चर्चेत आहे. करणने याआधी सिनेमातील आलिया भट, सोनाक्षी सिन्हा आणि वरूण धवन यांचा फर्स्ट लूक शेअर केला आहे.

kalank karan johar shares new poster madhuri dixit to play bahaar begum | 'कलंक'चे नवे पोस्टर आऊट, माधुरी दीक्षितवर खिळतील तुमच्या नजरा!

'कलंक'चे नवे पोस्टर आऊट, माधुरी दीक्षितवर खिळतील तुमच्या नजरा!

ठळक मुद्दे४० च्या दशकाची कथा कलंकमध्ये दाखवण्यात येणार आहेयेत्या १७ एप्रिलला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येतोय

कलंक सिनेमा त्याच्या घोषणेपासूनच या ना त्याकारणामुळे चर्चेत आहे. करणने याआधी सिनेमातील आलिया भट, सोनाक्षी सिन्हा आणि वरूण धवन यांचा फर्स्ट लूक शेअर केला आहे. त्यानंतर त्यांने आता आणखी एक पोस्टर सोशल मीडियावर शेअर केले आहे. या पोस्टरमध्ये माधुरी दीक्षित आपल्या भूमिकेत दिसतेय.




करणने शेअर केलेल्या फोटोमध्ये माधुरी दीक्षित बेगम बहारच्या भूमिकेत खुप सुंदर दिसतेय. या पोस्टरसोबत करणने एक कॅप्शनदेखील लिहिले आहे की, ‘#BahaarBegum हवा की तरह चलती है और उसकी आवाज नदी की तरह बहती है। #.    


 ४० च्या दशकाची कथा असलेल्या या चित्रपटात वरूण धवन, आलिया भट्ट, संजय दत्त, माधुरी दीक्षित, सोनाक्षी सिन्हा, आदित्य राय कपूर असे दमदार कलाकार आहेत. कलंक’ चित्रपटाच्या कथेची कल्पना करण जोहर आणि त्याचे वडील यश जोहरला पंधरा वर्षांपूर्वी सुचली होती. मात्र या चित्रपटाला कित्येक वर्ष मुहूर्त सापडत नव्हता. या चित्रपटाचा टीझर काही दिवसांपूर्वीच प्रेक्षकांच्या भेटीस आला असून चित्रपटाच्या टीझरला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.अभिषेक वर्मन यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. येत्या १७ एप्रिलला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येतोय. 

Web Title: kalank karan johar shares new poster madhuri dixit to play bahaar begum