'कलंक'च्या सेटवर माधुरी दीक्षितला यायची श्रीदेवीची आठवण
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2019 17:00 IST2019-03-13T17:00:00+5:302019-03-13T17:00:00+5:30
'कलंक' चित्रपटाचा टीझर नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या चित्रपटाच्या टीझरला खूप चांगला प्रतिसाद मिळाला असून या चित्रपटाच्या प्रदर्शनाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट पाहत आहेत.

'कलंक'च्या सेटवर माधुरी दीक्षितला यायची श्रीदेवीची आठवण
'कलंक' चित्रपटाचा टीझर नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या चित्रपटाच्या टीझरला खूप चांगला प्रतिसाद मिळाला असून या चित्रपटाच्या प्रदर्शनाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट पाहत आहेत. या चित्रपटात माधुरी दीक्षितने बहार बेगमची भूमिका साकारली आहे. तिच्या जागी दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी दिसणार होती. श्रीदेवीच्या निधनानंतर तिच्या जागी माधुरी दीक्षितची वर्णी लागली.
'कलंक' चित्रपटाच्या सेटवर श्रीदेवीची आठवण येत असल्याचे माधुरी दीक्षितने सांगितले. ती म्हणाली की, 'बहार बेगमची भूमिका माझ्यासाठी खूप आव्हानात्मक होती. तसेच भावनीक रित्या मी या भूमिकेशी जोडले गेले. कारण ही भूमिका दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी करणार होती. श्रीदेवीचे निधन हे आपल्या सर्वांसाठी दुःखाची बाब आहे. जेव्हा या भूमिकेसाठी मला संपर्क साधण्यात आला. त्यावेळी निर्णय घेणे सोप्पे नव्हते. मला तिचा खूप आदर वाटतो. ती एक चांगली अभिनेत्रीसोबत चांगली व्यक्तीदेखील होती. श्रीदेवी कलंक चित्रपटाचा एक भाग होती. त्यामुळे आम्हाला सेटवर तिची आठवण यायची. मात्र एकदा तुम्ही कामाला सुरूवात केली की तुम्हाला मागे वळून पाहायचे नसते आणि आपले काम करायचे असते. मीदेखील तेच केले. पण, मला श्रीदेवीची खूप आठवण आली. '
'कलंक' या चित्रपटाची निर्मिती करण जोहर, साजिद नाडियादवाडा व फॉक्स स्टार स्टुडिओजने केले आहे. या चित्रपटात वरूण धवन, आलिया भट, संजय दत्त, माधुरी दीक्षित, आदित्य रॉय कपूर, सोनाक्षी सिन्हा हे कलाकार मुख्य भूमिकेत आहेत. हा चित्रपट १७ एप्रिलला प्रदर्शित होणार आहे.