​‘कालाकांडी’ही आपटला! निर्मात्यांसाठी डोकेदुखी ठरतोय ‘नवाब’ सैफ अली खान!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2018 14:55 IST2018-01-16T09:25:48+5:302018-01-16T14:55:48+5:30

बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान याचे ग्रह सध्या ठीक नाहीयेत, असे दिसतेय. अर्थात आम्ही त्याच्या पर्सनल लाईफबद्दल नाही तर ...

'Kala-Kandi' also exploded! 'Nawab' Saif Ali Khan is a headache for producers | ​‘कालाकांडी’ही आपटला! निर्मात्यांसाठी डोकेदुखी ठरतोय ‘नवाब’ सैफ अली खान!!

​‘कालाकांडी’ही आपटला! निर्मात्यांसाठी डोकेदुखी ठरतोय ‘नवाब’ सैफ अली खान!!

लिवूड अभिनेता सैफ अली खान याचे ग्रह सध्या ठीक नाहीयेत, असे दिसतेय. अर्थात आम्ही त्याच्या पर्सनल लाईफबद्दल नाही तर प्रोफेशनल लाईफबद्दल बोलतोय. सैफ लाईफच्या प्रोफेशनल आयुष्यात गेल्या पाच वर्षांपासून एकही ‘करिश्मा’ झालेला नाही. दुसºया शब्दांत सांगायचे तर   गत २०१३ पासून सैफचा एकही चित्रपट बॉक्सआॅफिसवर कमाल दाखवू शकलेला नाही. या शुक्रवारी रिलीज झालेल्या ‘कालाकांडी’ या चित्रपटाकडून सैफला बºयाच अपेक्षा होत्या. पण त्याही धुळीस मिळाल्या. केवळ चारचं दिवसांत या चित्रपटाचा पूर्णत: बोजवारा उडाला आणि  ‘कालाकांडी’ही सैफच्या करिअरसाठी डिजास्टर सिद्ध झाला. या चित्रपटाने चार दिवसांत केवळ ३.४० कोटी कमावले. आमिर खाने ‘कालाकांडी’तील सैफच्या अभिनयाची तोंडभरून स्तूती केली होती. याऊपरही त्याचा हा चित्रपट प्रेक्षकांना भावला नाही. २५ कोटी खर्चून बनवण्यात आलेल्या या चित्रपटाने पहिल्या दिवशी १ कोटी कमावले. दुसºया दिवशी व तिसºया दिवशी प्रत्येकी ९५ लाख आणि चौथ्या दिवशी ५० कोटींचा बिझनेस केला.

ALSO READ : Christmas Party:​ ख्रिसमस पार्टीत पोहोचला तैमूर अली खान, मॉम -डॅडसोबत दिली झक्कास पोज!

  गतवर्षी सैफचे ‘रंगून’ आणि ‘शेफ’ असे दोन सिनेमे प्रदर्शित झाले होते. पण हे चित्रपटही दणकून आपटलेत. त्यापूर्वी आलेले फँटम, हॅपी एंडिंग, हमशक्ल्स, बुलेट राजा, गो गोवा गोन हे सैफचे एकापाठोपाठ आलेले सिनेमेही फ्लॉप ठरलेत. २०१३ मध्ये ‘रेस3’ हा सैफचा शेवटचा हिट सिनेमा होता. या चित्रपटाने ९३ कोटी कमावले होते. पण त्यानंतर त्याचवर्षी आलेला बुलेट राजा आणि गो गोवा गोन दोन्ही चित्रपट बॉक्सआॅफिसवर अपयशी ठरले होते. तेव्हापासून आजतागायत सैफने एकही हिट दिलेला नाही. आता तर निर्मात्यांसाठी सैफ डोकेदुखी ठरू लागल्याचे चित्र आहे. आता सैफचे ग्रह कसे आणि कधी बदलतात, तेच पाहणे आपल्या हातात आहे. तोपर्यंत निश्चितच प्रतीक्षा!

Web Title: 'Kala-Kandi' also exploded! 'Nawab' Saif Ali Khan is a headache for producers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.