Kajol Birthday Special : अजय देवगणसोबत लग्न करण्याआधी काजोल या व्यक्तीसोबत होती नात्यात?
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 5, 2019 17:03 IST2019-08-05T16:55:31+5:302019-08-05T17:03:51+5:30
काजोल आणि अजयचे लग्न होण्याआधी काजोल तिच्या एका मित्राला डेट करत होती. काजोल आणि तिच्या मित्राच्या अफेअरची त्यावेळी चांगलीच चर्चा रंगली होती.

Kajol Birthday Special : अजय देवगणसोबत लग्न करण्याआधी काजोल या व्यक्तीसोबत होती नात्यात?
काजोलचा आज वाढदिवस असून तिने बॉलिवूडमध्ये आपले एक स्थान निर्माण केले आहे. बॉलिवूडमधील आघाडीच्या अभिनेत्रींमध्ये तिची गणना केली जाते. गेल्या २० वर्षांहून अधिक काळापासून ती एकाहून एक हिट चित्रपट देत आहे. काजोलने कुछ कुछ होता है, कभी खुशी कभी गम, प्यार तो होना ही था यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये खूप चांगल्या भूमिका साकारल्या आहेत. तिचे लग्न अभिनेता अजय देवगणसोबत झाले असून लोकांना या दोघांचे कपल खूप आवडते. त्यांना न्यासा आणि युग अशी दोन मुले देखील आहेत.
तुम्हाला माहीत आहे की, काजोल आणि अजयचे लग्न होण्याआधी काजोल तिच्या एका मित्राला डेट करत होती. काजोल आणि तिच्या मित्राच्या अफेअरची त्यावेळी चांगलीच चर्चा रंगली होती. काजोल आणि कार्तिक मेहता हे दोघे एकमेकांचे खूप चांगले फ्रेंड्स होते. ते दोघे एकमेकांना अनेक वर्षं डेट करत होते. काजोल आणि अजयची ओळख झाली, त्यावेळी ते दोघेही इतर कोणाच्यातरी प्रेमात होते असे त्या दोघांनीच मुलाखतींमध्ये सांगितले आहे. काजोल आणि अजय यांची पहिली भेट हलचल या चित्रपटाच्या चित्रीकरणाच्यावेळी झाली होती.
पहिल्या भेटीत अजय खूप एकलकोंडा असल्याचे काजोलला वाटले होते तर काजोल सेटवर खूप दंगा मस्ती करते असे अजयला जाणवले होते. तसेच ती खूपच बडबडी असल्याची अजयला जाणीव झाली होती. ते दोघे एकमेकांपासून पूर्णपणे वेगळे असल्याचे त्या दोघांच्या लक्षात आले होते. पण याच कारणामुळे ते दोघे जवळ आले असे म्हणावे लागेल.
गुंडाराज या चित्रपटाचे चित्रीकरण सुरू होईपर्यंत त्या दोघांची चांगलीच मैत्री झाली होती. त्यावेळी काजोल कार्तिकला डेट करत होती. त्यांच्या नात्यात काही प्रॉब्लेम सुरू होते आणि त्यामुळे काजोल याबाबत अजयकडूनच सल्ला घेत असे तर त्यावेळी अजय अभिनेत्री करिश्मा कपूरला डेट करत असल्याचे म्हटले जात होते. रवीना टंडनसोबत ब्रेकअप झाल्यानंतर अजय करिश्माच्या प्रेमात पडला असल्याच्या चर्चांना त्याकाळी ऊत आले होते.