काजोलच्या लेकाला पुजाऱ्यांनी सर्वांसमोर उठवलं, पुढे काय घडलं?; नवरात्री उत्सवातील व्हिडीओ व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 30, 2025 17:12 IST2025-09-30T17:09:47+5:302025-09-30T17:12:35+5:30
काजोलचा लेक युगचा एक व्हिडीओ व्हायरल झालाय. यात भर मंडपात पुजाऱ्यांनी त्याला उठवलंय. मग पुढे काय घडलं? जाणून घ्या

काजोलच्या लेकाला पुजाऱ्यांनी सर्वांसमोर उठवलं, पुढे काय घडलं?; नवरात्री उत्सवातील व्हिडीओ व्हायरल
अभिनेत्री काजोल आणि मुखर्जी परिवार दरवर्षी नवरात्री उत्सव उत्साहात साजरा करतात. या उत्सवासाठी अनेक अभिनेत्री आणि बॉलिवूड कलाकार एकत्र येतात. जया बच्चन, राणी मुखर्जी, रणबीर कपूर, अयान मुखर्जी, ट्विंकल खन्ना असे अनेक सेलिब्रिटी या नवरात्री उत्सवाला हजेरी लावताना दिसतात. अशातच या नवरात्री उत्सवातील एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत काजोलच्या लेकाला पुजाऱ्यांनी सर्वांसमोर उठवलं आहे. पुढे काय घडलं? जाणून घ्या.
काजोलच्या लेकासोबत पुजाऱ्यांनी काय केलं?
सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत काजोलचा लेक युग देवीसमोर मांडी घालून बसलेला असतो. बाजूला त्याची आई अर्थात अभिनेत्री काजोल बसलेली दिसते. इतक्यात पुजारी तिथे येतात. काजोलच्या मुलासमोर पुजारी थांबतात. त्यानंतर सर्वांसमोर हाताला धरुन पुजारी त्याला उठवतात. काजोलचा लेक आधी उठायला नकार देतो. पण पुजारी त्याला जबरदस्ती सर्वांसमोर उठवतात. त्यानंतर ते युगच्या हातात माईक देतात. ''दुर्गा माँ की जय'', असं युग म्हणताना दिसतो. त्यानंतर सर्वजण टाळ्या वाजवतात. काजोल सुद्धा लेकाचं टाळ्या वाजवून कौतुक करते.
हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. काजोल आणि अजय देवगणच्या लेकाचा लाजाळू स्वभाव तरीही सर्वांसमोर आत्मविश्वासाने बोलल्याचं अनेकांनी कौतुक केलं आहे. काजोल आणि अजय देवगण यांना युग आणि निसा ही दोन मुलं आहेत. दोघेही आई-बाबांसोबत अनेक कार्यक्रम आणि समारंभांना एकत्र दिसतात. इतर स्टार किडची मुलं अभिनय क्षेत्रात पदार्पण करत असताना, काजोल - अजयची मुलं मात्र इंडस्ट्रीपासून दूर आहेत.