वयाची चाळीशी उलटली तरी काजोलची बहिण Tanishaa आहे अविवाहीत, अभिनेत्रीनेच सांगितलं होतं यामागचं कारण
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 19, 2022 13:20 IST2022-09-19T12:54:51+5:302022-09-19T13:20:15+5:30
काजोलची(Kajol) बहीण तनिषा मुखर्जी(Tanishaa Mukerji ) तिच्या फिल्मी करिअरपेक्षा तिच्या खासगी आयुष्यामुळे जास्त चर्चेत असते. ४० उलटूनही तनिषा अद्याप अविवाहीत आहे.

वयाची चाळीशी उलटली तरी काजोलची बहिण Tanishaa आहे अविवाहीत, अभिनेत्रीनेच सांगितलं होतं यामागचं कारण
Tanishaa Mukerji Marriage:काजोलची(Kajol) बहीण तनिषा मुखर्जी(Tanishaa Mukerji ) तिच्या फिल्मी करिअरपेक्षा तिच्या खासगी आयुष्यामुळे जास्त चर्चेत असते. तनीषा मुखर्जी बॉलिवूडच्या काही चित्रपटांत दिसली़ पण बॉलिवूडमध्ये तिचा टीकाव लागला नाही. तिची गणना इंडस्ट्रीतील फ्लॉप आणि अयशस्वी अभिनेत्रींमध्ये केली जाते. तनिषा मुखर्जी चित्रपट कुटुंबातून आलेली आहे. अभिनेत्रीची मोठी बहीण काजोल (Kajol)बॉलिवूडची टॉप अभिनेत्री आहे. त्याचबरोबर तनिषाची आई तनुजा हिचे नाव इंडस्ट्रीतील दिग्गज अभिनेत्रींमध्ये सामील झाले आहे.
मात्र, आज आम्ही तुम्हाला तनिषाचे लव्हलाईफबाबत काय मत आहे ते सांगणार आहोत. खरं तर तनिषा 44 वर्षांची आहे आणि अभिनेत्रीचे अजून लग्न झालेले नाही. या गोष्टीबद्दल लोकांच्या मनात अनेकदा प्रश्न निर्माण होतात की तनिषा लग्न कधी करणार आहे?
एका मुलाखतीत तनिषाने स्वतः प्रेम आणि लग्नाविषयी मोकळेपणाने सांगितले. तनिषाने या मुलाखतीत सांगितले होते की, लग्न करणे तिला फारसे आवडत नाही. जोपर्यंत एखादा चांगला मुलगा कुणी आयुष्यात आला तर लग्न करु असंही तिने सांगितले होतं.
आज तनिषा इंडस्ट्रीपासून लांब आहे. कोणत्याही सिनेमात ती झळकलेली नाही. बॉलिवूडमध्ये तरी तनिषाचे करिअर फ्लॉप ठरले.सुरुवातील तनिषाने 'शूssss' या चित्रपटातून पदार्पण केलं. यानंतर 'नील एंड निक्की', 'सरकार राज', 'वन टू थ्री', 'टैंगो चार्ली' चित्रपटात ती झळकली. मात्र हे सगळे चित्रपट तिकीटखिडकीवर आपटले.‘बिग बॉस’सारखे रिअॅलिटी शो सुद्धा केलेत. पण या शोनेही तनीषाला फार काही मिळाले नाही. ना नव्या ऑफर, ना लोकप्रियता.