"ते जगातील सर्वात झपाटलेल्या ठिकाणांपैकी एक" काजोलला आलेला 'भुताटकी'चा अनुभव, म्हणाली "देवानेच मला वाचवलं"

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 19, 2025 14:35 IST2025-06-19T14:35:17+5:302025-06-19T14:35:42+5:30

काजोलनं सांगितलं जगातील सर्वात झपाटलेलं ठिकाण, म्हणाली...

Kajol Share Her Horror Experience In Hyderabad Ramoji Film City | Film Maa | "ते जगातील सर्वात झपाटलेल्या ठिकाणांपैकी एक" काजोलला आलेला 'भुताटकी'चा अनुभव, म्हणाली "देवानेच मला वाचवलं"

"ते जगातील सर्वात झपाटलेल्या ठिकाणांपैकी एक" काजोलला आलेला 'भुताटकी'चा अनुभव, म्हणाली "देवानेच मला वाचवलं"

Kajol Share Her Horror Experience : हॉरर सिनेमे आणि त्यातील थरारक दृश्य यांचा मोठ्या प्रमाणावर चाहता वर्ग आहे. आतापर्यंत हॉरर जॉनरमध्ये अनेक प्रयोग झालेत आणि काही उत्तम चित्रपट तयार झाले, ज्यांनी प्रेक्षकांच्या मनावर गडद छाप पाडली. सध्या अभिनेत्री काजोल हिच्या आगामी 'माँ' चित्रपटाची जोरदार चर्चा सुरू आहे. काजोल सध्या जोरदार प्रमोशन करताना पाहायला मिळत आहेत. त्यानिमित्त काजोलनं तिला आलेला 'भुताटकी'चा अनुभव शेअर केलाय.

नुकतंच एका Galatta India शी बोलताना काजोलनं तिला फिल्म सिटी रामोजीबद्दल एक धक्कादायक गोष्ट सांगितली. तिथे शूटिंग करताना तिला नेहमीच अस्वस्थ वाटतं, असं काजोलनं सांगितलं. काजोल म्हणाली, "नकारात्मक उर्जा किंवा "भूतिया वाईब्स" आपण असं म्हणतो. कधी-कधी असं होतं की आपण अशा ठिकाणी जातो, तिथे आपल्याला अस्वस्थ वाटतं.  अशा बऱ्याच ठिकाणी शुटिंग केलंय. जिथे व्यवस्थित झोपही आली नाही आणि तेथून लवकर निघून जावं वाटलं.  याची उत्तम उदाहरणे आपल्याकडे आहेत, हैदराबादमधील रामोजी राव स्टुडिओ... जे जगातील सर्वात भयानक ठिकाणांपैकी एक मानलं जातं.  म्हणून मला वाटतं की देवाने माझे रक्षण केलंय की मी आजपर्यंत काहीही पाहिलेल नाही".

रामोजी फिल्म सिटीबद्दल...

रामोजी फिल्म सिटी हे फिल्म सिटी भारतातील प्रमुख चित्रपट निर्मिती ठिकाणांपैकी एक आहे आणि बॉलिवूड, टॉलिवूडसह अनेक भाषांमधील ब्लॉकबस्टर चित्रपटांचे चित्रीकरण येथे झाले आहे. रामोजी फिल्म सिटी हे तेलंगणा राज्यात हैदराबाद शहराजवळ स्थित आहे. या फिल्मसिटीमध्ये एअरपोर्ट, आकर्षक उद्यान, मोठे हॉटेल्स, तुरूंग, इत्यादी प्रकारचे मोठे सेट्स उभारण्यात आलेले आहेत.  विशेष म्हणजे रामोजी फिल्मसिटीला जगातील सर्वात मोठा फिल्म स्टुडिओ म्हणून गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्सकडून मान्यता आणि प्रमाणपत्र मिळाले आहे.

Web Title: Kajol Share Her Horror Experience In Hyderabad Ramoji Film City | Film Maa