अजय देवगणच्या 'फिंगर डान्स स्टेप'वर काजोलची प्रतिक्रिया चर्चेत; हसूनच म्हणाली- "त्याचा डान्स हा.."
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 11, 2025 14:58 IST2025-07-11T14:58:31+5:302025-07-11T14:58:51+5:30
अजय देवगणच्या 'सन ऑफ सरदार २'मधील गाण्याच्या डान्स स्टेपवर काजोलने दिलेली खास प्रतिक्रिया चर्चेत आहे. काय म्हणाली?

अजय देवगणच्या 'फिंगर डान्स स्टेप'वर काजोलची प्रतिक्रिया चर्चेत; हसूनच म्हणाली- "त्याचा डान्स हा.."
अजय देवगणच्या 'सन ऑफ सरदार २' सिनेमाची उत्सुकता आहे. या सिनेमात अजय देवगण पुन्हा जस्सीची भूमिका साकारणार आहे. काही दिवसांपूर्वी या सिनेमातील 'पहला तू, दुजा तू' हे गाणं रिलीज झालं. या गाण्यात अजय देवगणने केलेल्या डान्स स्टेपची चांगलीच चर्चा झाली. कोणताही वेगळा डान्स न करता फक्त बोटांच्या हालचालीने अजयने हा डान्स केला. अजय देवगणच्या या डान्सची नेटकऱ्यांनी चांगलीच उडवली. या डान्सवर अजयची पत्नी आणि अभिनेत्री काजोलने प्रतिक्रिया दिली
अजय हा बेस्ट डान्सर आहे
सोशल मीडियावर मिस मालिनीने एक व्हिडीओ शेअर केलाय. या व्हिडीओत काजोलला अजय देवगण-मृणाल ठाकूरचा हा फिंगर डान्स दाखवण्यात आला. हा डान्स पाहून काजोलही हसली. म्हणाली- "मला वाटतं की अजय देवगण हा फिल्म इंडस्ट्रीमधील बेस्ट डान्सर आहे. कारण अजय हा एकमेव असा अभिनेता आहे जो फक्त त्याच्या बोटांच्या साहाय्याने डान्स करु शकतो.", अशा शब्दात काजोलने तिची खास प्रतिक्रिया दिली आहे. याशिवाय अजयचंही कौतुक केलं.
अजय - मृणालच्या डान्स स्टेपची चर्चा
काही दिवसांपूर्वी 'सन ऑफ सरदार २' मधील 'पहला तू दुजा तू' हे गाणं रिलीज झालं. या गाण्यात अजय आणि मृणालची स्टेप सर्वांना खूपच विनोदी वाटली. शरीराची फारशी हालचाल न करता फक्त एकमेकांचा हात हातात घेऊन ते एक दोन तीन चार अशा प्रकारे बोटांची हालचाल करत आहेत. मागे स्कॉटलंड लेकचा नजारा पाहायला मिळाला. अजय देवगण सरदार लूकमध्ये दिसतोय. तर मृणालही वेस्टर्न लूकमध्ये गोड दिसत आगे. मात्र त्यांच्या डान्सची नेटकरी खिल्ली उडवत आहेत. अजय देवगणला नाचता येत नाही म्हणून निर्मात्यांनी हाी खास शक्कल लढवली. परंतु नेटकऱ्यांनी मात्र या डान्सची मस्करी केली.