राजकारणात येणार का? या प्रश्नावर काजोलनं स्पष्टच सांगितलं!
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 9, 2025 12:31 IST2025-09-09T12:29:42+5:302025-09-09T12:31:20+5:30
काजोल राजकारणात प्रवेश करणार?

राजकारणात येणार का? या प्रश्नावर काजोलनं स्पष्टच सांगितलं!
Kajol On Political Entry : लोकप्रिय अभिनेत्री काजोल लवकरच 'द ट्रायल' या वेब सीरिजच्या दुसऱ्या सीझनमधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अमेरिकन वेब सीरिज ‘द गुड वाईफ’चा रिमेक असलेल्या 'द ट्रायल'च्या पहिल्या सीझनला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला होता. आता त्याचा पुढचा भाग 'द ट्रायल सीझन २: प्यार कानून धोखा' १९ सप्टेंबर रोजी जिओ हॉटस्टारवर प्रदर्शित होणार आहे. नुकत्याच झालेल्या एका मुलाखतीत काजोलने तिच्या भूमिकेबद्दल आणि राजकारणाबद्दल काही महत्त्वाचे खुलासे केले.
शोमध्ये काजोलने साकारलेली 'नोयोनिका' ही राजकारणापासून दूर राहू इच्छिते. याच संदर्भात जेव्हा तिला राजकारणात येण्याची संधी मिळाल्यास काय करशील, असा प्रश्न विचारला, तेव्हा तिने स्पष्टपणे सांगितले, "मला राजकारण समजत नाही. मी स्वप्नातही राजकारणात येऊ शकत नाही. मला जे समजत नाही त्यात मी कधीच पडणार नाही.".
'द ट्रायल सीझन २' बद्दल बोलताना काजोल म्हणाली, "ही फक्त एक मालिका नाही, तर एक सामाजिक उपक्रम आहे. समाजातील अशा अनेक कथा या शोमधून समोर येतात, ज्याकडे अनेकदा दुर्लक्ष केले जाते. अशा कथेचा भाग होणे ही माझ्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे".
'द ट्रायल'मध्ये काजोलने वकील नोयोनिका आणि जिशु सेनगुप्ताने तिचा पती राजीव सेनगुप्ता यांची भूमिका साकारली आहे. या शोमध्ये दोघांचीही दमदार केमिस्ट्री पाहायला मिळाली. 'द ट्रायल सीझन २' मधून काजोल पुन्हा एकदा तिच्या भूमिकेने प्रेक्षकांची मनं जिंकेल अशी अपेक्षा आहे.