काजोलने इव्हेंटमध्ये सनी लिओनीला केलं इग्नोर, झाली ट्रोल, नेटकरी म्हणाले - "ही नवीन जया बच्चन"
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 20, 2025 11:27 IST2025-06-20T11:27:20+5:302025-06-20T11:27:45+5:30
Kajol : बॉलिवूड अभिनेत्री काजोल सध्या सर्वत्र चर्चेत आहे. तिचा 'मां' हा चित्रपट प्रदर्शित होण्यासाठी सज्ज आहे. काजोल 'मां' या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहे. हा चित्रपट २७ जून रोजी प्रदर्शित होणार आहे.

काजोलने इव्हेंटमध्ये सनी लिओनीला केलं इग्नोर, झाली ट्रोल, नेटकरी म्हणाले - "ही नवीन जया बच्चन"
बॉलिवूड अभिनेत्री काजोल सध्या सर्वत्र चर्चेत आहे. तिचा 'मां' हा चित्रपट प्रदर्शित होण्यासाठी सज्ज आहे. काजोल 'मां' या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहे. हा चित्रपट २७ जून रोजी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाच्या प्रमोशनमुळे काजोल अनेक कार्यक्रमांमध्ये स्पॉट झाली आहे. अलीकडेच ती एका इव्हेंटमध्ये गेली होती, जिथे सनी लिओनीदेखील उपस्थित होती. त्यावेळी काजोलने सनीकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे काजोल चांगलीच ट्रोल झाली आहे.
व्हायरल व्हिडीओमध्ये सनी लिओनी पांढऱ्या ड्रेसमध्ये पापाराझींसाठी पोझ देताना दिसत आहे. काजोल देखील तिथे येते. पण ती थांबते आणि सनी निघून जाण्याची वाट पाहते. सनी गेल्यानंतर काजोल रेड कार्पेटवर जाते. या दरम्यान काजोलने सनीला हाय-हॅलो म्हटले नाही. ती तिची पोझ देऊ लागते. काजोलच्या लूकबद्दल बोलायचे झाले तर तिने हिरव्या रंगाची साडी नेसली आहे.
काजोल आणि सनी लिओनीच्या या व्हिडीओवर नेटकरी खूप कमेंट करत आहेत. नेटकरी काजोलच्या वृत्तीला चुकीचे म्हणत आहेत. एका युजरने लिहिले, ही नवीन जया बच्चन आहे. दुसऱ्याने लिहिले की, मी काजोललाही दुर्लक्ष करेन. आणखी एकाने लिहिले की, काजोलला वाटते की ती टॉपला आहे. दुसऱ्याने लिहिले की, सनी काजोलपेक्षा चांगली दिसते. हा व्हिडिओ व्हायरल होतो आहे. काजोलच्या अॅटिट्युड मुळे तो खूप शेअर केला जात आहे. हजारो लोकांनी हा व्हिडिओ लाईक देखील केला आहे.
वर्कफ्रंट
वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर, काजोलचा 'मां' चित्रपट २७ जून रोजी प्रदर्शित होत आहे. हा एक पौराणिक-भयपट आहे. ज्यामध्ये काजोल तिच्या मुलीला वाचवण्यासाठी काहीही करण्यास तयार आहे. सनी लिओनी सोशल मीडियावर खूप सक्रीय आहे पण तिने तिच्या नवीनतम प्रोजेक्टबद्दल कोणतीही माहिती दिलेली नाही.