​करण जोहरसोबत झालेल्या भांडणाबाबत अखेर काजोलने मौन सोडले

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2017 13:57 IST2017-02-20T08:27:31+5:302017-02-20T13:57:31+5:30

करण जोहर आणि काजोल यांची मैत्री अनेक वर्षांपासून खूप घट्ट आहे. करण तर काजोलला आपला लकी चार्म मानतो. त्याच्या ...

Kajol finally left the silence with Karan Johar | ​करण जोहरसोबत झालेल्या भांडणाबाबत अखेर काजोलने मौन सोडले

​करण जोहरसोबत झालेल्या भांडणाबाबत अखेर काजोलने मौन सोडले

ण जोहर आणि काजोल यांची मैत्री अनेक वर्षांपासून खूप घट्ट आहे. करण तर काजोलला आपला लकी चार्म मानतो. त्याच्या प्रत्येक चित्रपटात एखाद्या छोट्य़ाशा भूमिकेत तरी काजोल दिसते. करण जोहरने दिग्दर्शित केलेल्या कुछ कुछ होता है या चित्रपटापासून हा सिलसिला सुरू आहे. करण आणि काजोलने त्यांच्या मैत्रीचे किस्सेदेखील अनेक कार्यक्रमात सांगितले आहेत.  पण गेल्या काही महिन्यांपासून त्यांच्यात वाद सुरू असल्याच्या बामत्या येत आहेत. 
करण जोहरचा ऐ दिल है मुश्किल आणि अजय देवगणचा शिवाय हा चित्रपट एकाच दिवशी प्रदर्शित झाला. शिवाय या चित्रपटाची निगेटिव्ह पब्लिसिटी करण्यासाठी करणने मला पैसे दिले असे कमाल खान म्हणजे केआरकेने म्हटले होते. तेव्हापासूनच करण आणि अजयमध्ये भांडणे सुरू होती आणि यामुळे करण आणि काजोल यांच्यातदेखील दुरावा निर्माण झाला आहे. 
करण आणि काजोल गेल्या अनेक महिन्यांपासून एकमेकांशी बोलत नाहीये. करणने त्याच्या अॅन अनसुटेबल बॉय या आत्मचरित्रात याबाबत उल्लेखदेखील केला आहे. त्याने या पुस्तकात म्हटले आहे की, माझी आणि करणची मैत्री आता तुटलेली आहे. 
करणने पुस्तकात हे नमूद केल्यानंतरदेखील काजोलने याबाबत मौन राखणे पसंत केले होते. गेल्या कित्येक महिन्यात याबाबत ती काहीच बोलत नव्हती. पण नुकत्याच तिने दिलेल्या एका मुलाखतीत तिने करण आणि तिच्यात आलेल्या दुराव्याबाबत सांगितले आहे. करण आणि तिच्यात झालेल्या भांडणाबाबत काजोल सांगते, "केवळ वैयक्तिकच नाही तर व्यवसायिक नाते टिकवणेदेखील खूप कठीण असते असे मला वाटते. पण करणसोबत असलेल्या माझ्या नात्याबाबत मी सध्या तरी काहीही बोलू इच्छित नाही."

Web Title: Kajol finally left the silence with Karan Johar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.