अनेक लोक भुकेने मरत आहेत आणि तू...! काजोलचा हा व्हिडीओ पाहून संतापले लोक

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 27, 2021 18:25 IST2021-04-27T18:24:06+5:302021-04-27T18:25:06+5:30

होय, काजोलने स्वत:चा एक व्हिडीओ शेअर केला आणि हा व्हिडीओ पाहून लोक तिच्यावर संतापले.

kajol devgn shares a video on social media users trolled her for insulting food | अनेक लोक भुकेने मरत आहेत आणि तू...! काजोलचा हा व्हिडीओ पाहून संतापले लोक

अनेक लोक भुकेने मरत आहेत आणि तू...! काजोलचा हा व्हिडीओ पाहून संतापले लोक

ठळक मुद्दे‘बाजीगर’ या चित्रपटानंतर काजोलला ख-या अर्थाने यश मिळाले. त्यानंतर तिने ये दिल्लगी, इश्क, प्यार किया तो डरना क्या, प्यार तो होना ही था, कुछ कुछ होता है, दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे असे एकाहून एक हिट चित्रपट दिले.

बॉलिवूड अभिनेत्री काजोल (Kajol) सध्या सोशल मीडियावर ट्रोल होतेय. कारण काय तर  अन्नाचा अपमान केल्यामुळे. होय, काजोलने स्वत:चा एक व्हिडीओ शेअर केला आणि हा व्हिडीओ पाहून लोक तिच्यावर संतापले.
काजोलने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ शेअर केला. यात काजोल एक स्टंट करताना दिसतेय. काय तर सफरचंद हवेत कापण्याचा. होय, काजोल हवेत एक सफरचंद फेकले आणि हवेतच ते कापते. ‘मूड’ असे कॅप्शन देत काजोलने हा व्हिडीओ शेअर केला. पण तिचा हा व्हिडीओ लोकांना आवडला नाही. हा अन्नाचा अपमान असल्याच्या प्रतिक्रिया लोकांनी दिल्यात. (Kajol devgn shares a video on social media )

लोक भुकेने मरत आहेत, तेव्हा अन्नाचा असा अपमान करू नकोस, अन्नाची अशी नासाडी करू नकोस, असे एका युजरने तिला सुनावले. मॅडम, तुम्हाला यात काय आनंद मिळाला, जरा सांगा, असे उपरोधिकपणे एका युजरने लिहिले. एका युजरने तर मजेदार कमेंट केली. ‘तू तुझा गुप्त हा सिनेमा पुन्हा पाहिलास का?’, असे या युजरने लिहिले.  
काजोल अलीकडे काही मोजके सिनेमे करते. पण सोशल मीडियावर मात्र ती कमालीची अ‍ॅक्टिव्ह दिसते. स्वत:चे वेगवेगळे फोटो, व्हिडीओ ती शेअर करत असते.

‘बाजीगर’ या चित्रपटानंतर काजोलला ख-या अर्थाने यश मिळाले. त्यानंतर तिने ये दिल्लगी, इश्क, प्यार किया तो डरना क्या, प्यार तो होना ही था, कुछ कुछ होता है, दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे असे एकाहून एक हिट चित्रपट दिले. आज बॉलिवूडमधील आघाडीच्या अभिनेत्रींमध्ये तिची गणना केली जाते.  

Web Title: kajol devgn shares a video on social media users trolled her for insulting food

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Kajolकाजोल