"आम्ही ९ ते ५ जॉब करणाऱ्यांपेक्षा जास्त मेहनत करतो...", काजोल बरळली, म्हणाली- "आम्हाला १२-१४ तास..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 19, 2025 14:06 IST2025-10-19T14:04:07+5:302025-10-19T14:06:57+5:30
काजोलने इंडस्ट्रीत काम करणारे कलाकार आणि ९ ते ५ काम करणाऱ्या ऑफिस कर्मचाऱ्यांची तुलना केली आहे. नेमकं काय म्हणाली काजोल, ते जाणून घेऊया.

"आम्ही ९ ते ५ जॉब करणाऱ्यांपेक्षा जास्त मेहनत करतो...", काजोल बरळली, म्हणाली- "आम्हाला १२-१४ तास..."
अनेकदा कलाकार त्यांच्या नकळत अशी काही वक्तव्ये करतात ज्यामुळे त्यांचे चाहतेही दुखावले जातात. बॉलिवूड अभिनेत्री काजोलनेही सध्या असंच वक्तव्य केलं आहे. ज्यामुळे तिला ट्रोल केलं जात आहे. काजोलने इंडस्ट्रीत काम करणारे कलाकार आणि ९ ते ५ काम करणाऱ्या ऑफिस कर्मचाऱ्यांची तुलना केली आहे. नेमकं काय म्हणाली काजोल, ते जाणून घेऊया.
काजोल सध्या टू मच हा सेलिब्रिटी चॅट शो होस्ट करते. या शोमध्ये वरुण धवन आणि आलिया भट सहभागी झाले होते. काजोलसोबत ट्विंकल खन्नादेखील हा शो होस्ट करते. या शोमध्ये काजोल ९ ते ५ काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांबद्दल बरळली आहे. कलाकारांना त्यांच्यापेक्षा जास्त मेहनत करावी लागते, असं ती म्हणाली. तिच्या या वक्तव्याशी ना वरुण सहमत होता ना आलिया. तरीही काजोलने आपलचं वक्तव्य कसं बरोबर, हेही सांगितलं.
"आपल्याला काम करताना खूप अॅक्टिव्ह व्हावं लागतं. तुम्ही काम करत असाल तर तुम्हाला १०० टक्के द्वावे लागतात. आपल्यापैकी काही जण त्यांचे १०० टक्के देतात. पण जेव्हा मी एका सिनेमाचं शूटिंग करत असते. तेव्हा सलग शूटिंग असतं. आता लीगल ड्राम द ट्रायलच्या दुसऱ्या सीझनसाठी ३५-४० दिवसांचं शूटिंग होतं. मला रोज लवकर उठावं लागत होतं. व्यायामही करायचा असतो. तुमचं जेवण योग्य असलं पाहिजे आणि वेळेत आलं पाहिजे. कारण, एक इंचही वजन तुम्ही वाढवू शकत नाही. कारण मग तुम्हाला कपडे व्यवस्थित होणार नाहीत. हा एकप्रकारे दबाव असतो. ही एक मोठी गोष्ट आहे, असं मला वाटतं", असं काजोल म्हणाली.
९ ते ५ काम करणाऱ्यांबद्दल काजोल काय म्हणाली?
काजोल म्हणाली, "अभिनय करत असलो तरी इव्हेंटसाठीही जावं लागतं. १२-१४ तास अॅक्टिव्ह राहणं हे कठीण काम आहे. ९-५ काम करणारे डेस्कवर बसलेले असतात. त्यामुळे तुम्हाला तिथे पूर्ण वेळ देण्याचीही गरज नसते. तुम्ही टी ब्रेक घेऊ शकता, आराम करू शकता, खेळू शकता, कंटाळा आला तर फेरफटकाही मारू शकता. आणि त्यासोबतच तुम्ही तुमचं कामंही करता. मी असं नाही म्हणत की आम्ही टी किंवा कॉफी ब्रेक घेत नाही. पण आम्ही तुमच्यासारखं करू शकत नाही".