बाप रे बाप! दोन बंगले असूनही काजोलने मुंबईत खरेदी केले दोन नवे फ्लॅट्स, किंमत वाचून व्हाल अवाक्
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2022 15:13 IST2022-02-17T13:50:06+5:302022-02-17T15:13:54+5:30
Kajol New Apartments: गेल्या वर्षी काजोल आणि अजय देवगणने जुहूमध्ये आलिशान बंगला खरेदी केला होता. त्याची किंमत जवळपास 60 कोटी रुपये आहे.

बाप रे बाप! दोन बंगले असूनही काजोलने मुंबईत खरेदी केले दोन नवे फ्लॅट्स, किंमत वाचून व्हाल अवाक्
Kajol New Apartments: अजय देवगण (Ajay Devgn) व काजोल (Kajol ) यांच्याकडे अमाप संपत्ती आहे. आता त्यात आणखी भर पडली आहे. होय, काजोलने जुहू भागात आणखी दोन अलिशान अपार्टमेंट खरेदी केले आहेत. काजोल ‘शिवशक्ती’ या बंगल्यात राहते. या बंगल्याच्याच जवळच्या अनन्या बिल्डींगमध्ये काजोलने दोन अपार्टमेंट खरेदी केले असल्याचं कळतंय. याची किंमत करोडोंमध्ये आहे.
2000 स्क्वेअर फुटांचे हे नवे फ्लॅट अनन्या बिल्डींगच्या 10 व्या फ्लोरवर आहेत. या दोन्हींची किंमत 11.95 कोटी आहे. प्रॉपर्टीच्या कागदपत्रांवर काजोलची स्वाक्षरी आहे. ‘स्क्वेअर फीट इंडिया’ने दिलेल्या वृत्तानुसार, या वर्षी जानेवारी महिन्यांत या फ्लॅटची खरेदी प्रक्रिया पार पडली.
गेल्या वर्षी काजोल आणि अजय देवगणने जुहूमध्ये आलिशान बंगला खरेदी केला होता. त्याची किंमत जवळपास 60 कोटी रुपये आहे. त्यांचा हा मुंबईतील दुसरा बंगला आहे. हा बंगला 5310 क्वेअर फूटामध्ये आहे. हा बंगला देखील अजय आणि काजोलच्या ‘शिव शक्ती’ बंगल्या शेजारी आहे. त्यांच्या बंगल्या शेजारी अभिनेता हृतिक रोशन, अक्षय कुमार, धर्मेंद्र आणि अमिताभ बच्चन यांचा बंगला आहे.
वर्कफ्रंटबद्दल सांगायचं तर काजोल गतवर्षी ‘त्रिभंगा’मध्ये दिसली होती. सध्या ती आणखी एका सिनेमाच्या शूटींगमध्ये बिझी आहे. ‘त्रिभंगा’ गतवर्षी जानेवारीत ओटीटीवर रिलीज झाला होता. रेणुका शहणे हिने दिग्दर्शित केलेल्या या चित्रपटात काजोलशिवाय मिथीला पालकर, तन्वी आझमी दिसल्या होत्या. अजय देवगणबद्दल म्हणाल तर त्याच्याकडे सध्या अनेक प्रोजेक्ट आहे. गंगूबाई काठियावाडी, आरआरआर हे त्याचे सिनेमे प्रदर्शनाच्या वाटेवर आहेत. याशिवाय रनवे 34, मैदान,सर्कस, थँक गॉड, भोला या चित्रपटांतही तो दिसणार आहे. त्याची ‘रूद्रा’ नामक वेबसीरिज येत्या 4 मार्चला रिलीज होतेय.