मेकअप की दुकान आहे अमिषा पटेल, प्रत्यक्ष आयुष्यात अशी दिसते 'कहो ना प्यार है'ची हिरोईन
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 1, 2019 15:01 IST2019-10-01T14:56:27+5:302019-10-01T15:01:51+5:30
'बिग बॉस 13' सिझनमध्ये पहिल्याच एपिसोडमध्ये अमिषाने घरात 'मालकीन' बनत दमदार एंट्री घेतली.

मेकअप की दुकान आहे अमिषा पटेल, प्रत्यक्ष आयुष्यात अशी दिसते 'कहो ना प्यार है'ची हिरोईन
'कहो ना प्यार है' सिनेमातून अमिषाने दणक्यात रूपेरी पडद्यावर हृतिकसह एंट्री घेतली. हृतिक रोशन आणि अमिषा या दोघांचाही हा पहिला सिनेमा होता. पदार्पणाच्या सिनेमातच दोघांनाही सुपरडुपर यश मिळालं आणि हा सिनेमाही सुपरहिट ठरला होता. सिनेमातून अमिषाच्या भूमिकेचे विशेष कौतुक करण्यात आले. या सिनेमानंतर मात्र अमिषाची जादू फिकी पडली आणि रातोरात मिळालेले अमिषाचे स्टारडम काहीसे कमी होवू लागले. तिने गदर, हमराज यांसारख्या चित्रपटांमध्ये खूप चांगल्या भूमिका साकारल्या. तरही तिचे सगळेच चित्रपट फ्लॉप झाले. आता तर तिला काम मिळणंही बंद झाली होती. जवळपास ग्लॅमर इंडस्ट्रीपासून अमिषा लांबच गेली होती.
अचानक 'बिग बॉस 13' सिझनमुळे अमिषा पुन्हा एकदा प्रकाशझोतात आली आहे. पहिल्याच एपिसोडमध्ये अमिषाने घरात 'मालकीन' बनत दमदार एंट्री घेतली. मात्र अमिषा पटेलचंबिग बॉसच्या घरात येणं रसिकांच्या फारसे पसंतीस पडलेले नाही. त्यामुळे सोशल मीडियावर नेटीझन्स अमिषाच्या नावाने फनी मिम्स बनवत तिची खिल्ली उडवत असल्याचे पाहायला मिळत आहे.
बिग बॉसच्या घरात अमिषाचा बदलेला अवतार पाहायला मिळाला. मेकअपमुळे ती ग्लॅमरस वाटत होती. मात्र विना मेकअप अमिषाला ओळखणेही शक्य नाही. तिचे विनामेकअप असलेले अनेक फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. या फोटोवर नजर टाकताच अमिषाचे खरे रूप पाहाताच आश्चर्य वाटेल यांत शंकाच नाही.