नितेश तिवारींच्या 'रामायण'मध्ये 'कहानी घर घर की'मधील पार्वतीची एन्ट्री, साक्षी तन्वर दिसणार 'या' भूमिकेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2024 16:36 IST2024-03-27T16:35:44+5:302024-03-27T16:36:38+5:30

'कहानी घर घर की'मधील पार्वती 'रामायण' सिनेमात दिसणार महत्त्वाच्या भूमिकेत

kahani ghar ghar ki fame actress sakshi tanwar will play rawan wife mandodari in nitesh tiwari ramayan | नितेश तिवारींच्या 'रामायण'मध्ये 'कहानी घर घर की'मधील पार्वतीची एन्ट्री, साक्षी तन्वर दिसणार 'या' भूमिकेत

नितेश तिवारींच्या 'रामायण'मध्ये 'कहानी घर घर की'मधील पार्वतीची एन्ट्री, साक्षी तन्वर दिसणार 'या' भूमिकेत

नितेश तिवारींचा ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या 'रामायण' हा बिग बजेट सिनेमा अनेक कारणांमुळे चर्चेत आहे. या सिनेमात बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर प्रभु श्री राम यांच्या भूमिकेत दिसणार आहे. तर दाक्षिणात्य अभिनेत्री साई पल्लवी या सिनेमात सीता मातेची भूमिका साकारताना दिसणार आहे. 'रामायण'मध्ये सुपरस्टार यश रावणाच्या भूमिकेत दिसणार असल्याची चर्चा आहे. आता या सिनेमाच्या स्टारकास्टबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. या सिनेमात आता 'कहानी घर घर की' फेम अभिनेत्री साक्षी तन्वरची वर्णी लागली आहे. 

साक्षी तन्वर ही एक सुप्रसिद्ध अभिनेत्री आहे. अनेक मालिका आणि सिनेमांमध्ये विविधांगी भूमिका साकारून तिने प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केलं. 'कहानी घर घर की' या मालिकेतील पार्वतीच्या भूमिकेने तिला लोकप्रियता मिळवून दिली. 'दंगल' या सिनेमातील तिच्या भूमिकेचंही कौतुक झालं होतं. आता साक्षी 'रामायण' सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमात ती रावणाची पत्नी मंडोदरीची भूमिका साकारताना दिसणार आहे. 

साक्षीने अनेक बॉलिवूड सिनेमामंध्ये महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. 'सम्राट पृथ्विराज' या सिनेमातही ती झळकली होती. अलिकडेच प्रदर्शित झालेल्या नेटफ्लिक्सच्या 'माई' या वेब सीरिजमध्येही ती मुख्य भूमिकेत दिसली होती. 

Web Title: kahani ghar ghar ki fame actress sakshi tanwar will play rawan wife mandodari in nitesh tiwari ramayan