Its a Baby Boy! बॉलिवूड अभिनेता झाला बाबा, पत्नी प्रसिद्ध गायिका, चाहत्यांनी केलं अभिनंदन

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 3, 2025 11:14 IST2025-06-03T11:12:17+5:302025-06-03T11:14:56+5:30

प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेता झाला बाबा. अभिनेता आणि त्याच्या पत्नीला मुलगा झाला असून सोशल मीडियावर त्यांचं चाहत्यांनी अभिनंदन केलंय

kahani fame actor parambrata chattopadhyay become father It's a Baby Boy | Its a Baby Boy! बॉलिवूड अभिनेता झाला बाबा, पत्नी प्रसिद्ध गायिका, चाहत्यांनी केलं अभिनंदन

Its a Baby Boy! बॉलिवूड अभिनेता झाला बाबा, पत्नी प्रसिद्ध गायिका, चाहत्यांनी केलं अभिनंदन

 मनोरंजन विश्वातून एक आनंदाची बातमी समोर येत आहे. बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता आणि दिग्दर्शक परंब्रता चट्टोपाध्याय आणि त्याची पत्नी पिया चक्रवर्ती यांच्या आयुष्यात नवीन पाहुणा आला आहे. १ जून रोजी परंब्रता आणि पिया आई-बाबा झाले असून त्यांना मुलगा झालाय. या दोघांनी ही आनंदाची बातमीची त्यांच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर केली. ही बातमी समोर येताच दोघांच्या चाहत्यांनी त्यांचं अभिनंदन केलंय. परंब्रताने विद्या बालनसोबत 'कहानी' सिनेमात साकारलेली पोलीस अधिकाऱ्याची भूमिका चांगलीच गाजली  होती.

परंब्रता आणि पियाने सोशल मीडिया पोस्टच्या माध्यमातून ही बातमी सर्वांसोबत शेअर केली. त्यांनी कॅप्शन लिहिलंय की,  "आम्हाला मुलगा झाला आहे! आमचं मन आनंदाने भरुन गेलं आहे. ज्युनियर, तुझं या जगामध्ये स्वागत आहे! आम्ही आमच्या मुलाचे या जगात स्वागत करत असताना, त्याच्यासाठी ज्यांनी ज्यांनी शुभेच्छा आणि प्रार्थना दिल्यात त्या प्रत्येकाचे आभार मानू इच्छितो!" खास गोष्ट म्हणजे ज्या दिवशी परंब्रता-पियाला मुलगा झाला त्याच दिवशी, बंगाली परंपरेतील 'जमाईषष्ठी' साजरी केली जाते, ज्यामुळे हा दिवस त्यांच्या कुटुंबासाठी अधिकच खास ठरला. 


परंब्रता चट्टोपाध्यायची बायको पिया ही गायिका आणि सामाजिक कार्यकर्ती आहे. परंब्रताने 'कहानी', 'बुलबुल', 'बाईशे श्रावण' आणि 'द्वितीयो पुरुष' यांसारख्या हिंदी-बंगाली चित्रपटांमध्ये त्याच्या अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. परंब्रताने नोव्हेंबर २०२३ मध्ये पिया चक्रवर्तीशी विवाह केला होता. लग्नाच्या २ वर्षांनंतर दोघांना मुलगा झाल्याने ते आणि त्यांंचं कुटुंबीय आनंदी आहेत.

Web Title: kahani fame actor parambrata chattopadhyay become father It's a Baby Boy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.