‘एम.एस. धोनी- दी अनटोल्ड स्टोरी‘ या चित्रपटात सुशात सिंग राजपूतसोबत दिसणारी अभिनेत्री कियारा अडवाणी लवकरच आयटम साँगमध्ये दिसणार आहे. ...
कियारा अडवाणीचे लवकरच आयटम साँग
/>‘एम.एस. धोनी- दी अनटोल्ड स्टोरी‘ या चित्रपटात सुशात सिंग राजपूतसोबत दिसणारी अभिनेत्री कियारा अडवाणी लवकरच आयटम साँगमध्ये दिसणार आहे. तिचे हे गाणे कॅटरिना व जॅकलिन फर्नांडिस यांच्या गाण्याला टक्कर देणारे असणार आहे. ‘फग्ली’ या चित्रपटापासून तिने आपले करिअर सुरु केले. दिग्दर्शक अब्बास मस्तानी तिला एक महत्वाची जबाबदारी देत आहे. कियारा ही अब्बास मस्तानीच्या आगामी ‘मशीन’ या चित्रपटात एक धमाकेदार गाणे सादर करणार आहे. हे गाणे ‘जरा जरा टच मी...’ व लत लग गई ’ यासारखे हे गाणे असणार आहे. या गाण्याकरिता तिने आतापासूनच खूप मेहनत घेण्यास सुरुवात केली आहे. अब्बास मस्तानी यांचा हा एक रोमांटीक चित्रपट असणार आहे. या चित्रपटाची अधिक शुटींग ही जॉर्जिया मध्ये केली जाणार आहे.