माझं डोकं फिरलं होतं...; ‘Kacha Badam’ फेम भुवन बड्याकरला का होतोय पश्चाताप?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2022 17:03 IST2022-04-08T16:59:51+5:302022-04-08T17:03:51+5:30

शेंगदाणे विकणारा भुवन बड्याकरचं (Bhuban Badyakar ) ‘कच्चा बादाम’ (Kacha Badam) हे गाणं इतकं तुफान व्हायरल झालं होतं की भुवन एका रात्रीत स्टार झाला होता. अगदी भुवनही स्वत:ला सेलिब्रिटी समजू लागला होता.

Kacha Badam Singer Bhuban Badyakar Admits Sudden Fame And Money Offers 'Spun' His Head | माझं डोकं फिरलं होतं...; ‘Kacha Badam’ फेम भुवन बड्याकरला का होतोय पश्चाताप?

माझं डोकं फिरलं होतं...; ‘Kacha Badam’ फेम भुवन बड्याकरला का होतोय पश्चाताप?

शेंगदाणे विकणारा भुवन बड्याकरचं (Bhuban Badyakar ) ‘कच्चा बादाम’ (Kacha Badam) हे गाणं किती लोकप्रिय झालं, हे नव्यानं सांगायची गरज नाही. गाणं इतकं तुफान व्हायरल झालं की भुवन एका रात्रीत स्टार झाला. अगदी भुवनही स्वत:ला सेलिब्रिटी समजू लागला. आता मी सेलिब्रिटी झालोय. आता मी शेंगदाणे विकणार नाही, असं तो म्हणाला. भुवनच्या डोक्यात हवा गेलेली पाहून अनेकांनी त्याला ट्रोलही केलं.यादरम्यान भुवनचा अपघात झाला आणि या अपघातानंतर तो पुन्हा एकदा जमिनीवर आला. ताज्या मुलाखतीत त्याने वेगळाच खुलासा केला आहे. होय, अचानक मिळालेल्या प्रसिद्धीनं माझं डोकं फिरलं होतं. पण आता मला सगळं कळून चुकलं आहे, असं तो म्हणाला.

माझं डोकं फिरलं होतं...
अचानक माझ्याजवळ पैसा आल्यानं मी भरकटलो होतो. माझं डोकं फिरलं होतं. पण आता मला कळून चुकलंय. मला कसं जगायचं, हे मला समजलंय. मी काही सेलिब्रिटी नाही. पैसे येताच मी एक जुनी कार घेतली. पण त्या कारची मला गरज नाही, हे मला नंतर कळलं. मी थोडा वाहावत गेलो. त्याबद्दल चाहत्यांनी मला माफ करावं. मी आता पुन्हा पहिल्यासारखा जगू लागलो आहे, असं भुवन या मुलाखतीत म्हणाला.
कच्चा बादामच्या यशानंतर मला केरळ, बांगलादेश, दुबई अशा ठिकाणांहून परफॉर्म करण्याच्या ऑफर आल्या. पण मी विदेशात जाऊ शकत नव्हतो. कारण माझ्याकडे पासपोर्ट नाही. मी विदेशात जावं, याला पत्नीही राजी नव्हती. त्यामुळे मी त्या ऑफर स्वीकारल्या नाहीत, असंही त्याने सांगितलं.
कच्चा बादामनंतर मी आणखी दोन गाणी कम्पोज केली आहे. एक सारेगामापा आहे आणि दुसरं अमार नोतुन गारी असं आहे. ही गाणी रिलीजसाठी तयार आहेत, अशी माहितीही त्याने दिली.


 
मी तसं बोलायला नको होतं....
अलीकडे एका कार्यक्रमातही भुवन असाच ‘पश्चातापा’चे बोल बोलला होता. ‘मी तसं बोलायला नको होतं. मला आता त्याची जाणीव झाली आहे. मी आता सेलिब्रिटी झालोय, शेंगदाणे विकणार नाही, असं मी म्हणालो होतो. पण तो अहंकार नव्हता. लोकांनीच मला सेलिब्रिटी बनवलं. पण गरज पडली तर मी पुन्हा शेंगदाणे विकेल. मी एक सामान्य माणूस आहे आणि आत्तापर्यंत जगत होतो, तसाच जगणार. हे स्टारडम, ग्लॅमर व मीडिया फार काही माझ्या भोवती फिरणारा नाही. मी सर्वांना सांगू इच्छितो की एक व्यक्ति म्हणून माझ्ज्यात कोणताही बदल झालेला नाही,’असं भुवन म्हणाला होता.
काही दिवसांपूर्वीच भुवनच्या कारला अपघात झाला होता. कार चालवणं शिकत असताना त्याची कार भिंतीवर आदळली होती. यात त्याला दुखापत झाली होती, पण आता तो बरा आहे.  


ह्यकच्चा बादामह्णया गाण्यामुळे भुवनचं पार आयुष्यच बदलून गेलं. एका लहानशा खेड्यात शेंगदाणे विकणारा हा व्यक्ती आता चक्क एका म्युझिक अल्बममध्ये थिरकताना दिसत आहे. त्याच्या गाण्याचा रिमेक वर्जन तयार करण्यात आला आहे आणि यामध्ये भुवन हिरोच्या भूमिकेत दिसत आहे. तो सुंदर सुंदर मॉडेल्ससोबत डान्स करताना दिसत आहे. 

Web Title: Kacha Badam Singer Bhuban Badyakar Admits Sudden Fame And Money Offers 'Spun' His Head

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.