कबीर खानच्या '८३' सिनेमात साहिल साकारतोय या क्रिकेटरची भूमिका
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 1, 2019 17:02 IST2019-02-01T16:42:48+5:302019-02-01T17:02:22+5:30
'८३' या सिनेमा भारतीय विश्वचषक विजयाची कथा सांगणारा आहे सिनेमा कबीर खान आपल्या भेटीला घेऊन येतोय. या सिनेमात रणवीर सिंग कपिल देव यांची भूमिका साकारणार आहे.

कबीर खानच्या '८३' सिनेमात साहिल साकारतोय या क्रिकेटरची भूमिका
'८३' या सिनेमा भारतीय विश्वचषक विजयाची कथा सांगणारा आहे सिनेमा कबीर खान आपल्या भेटीला घेऊन येतोय. या सिनेमात रणवीर सिंग कपिल देव यांची भूमिका साकारणार आहे. नुकताच मिळालेल्या माहितीनुसार यात क्रिकेटर सैयद किरमानी यांची भूमिका साहिल खट्टर साकारणार असल्याचे समजतेय. सैयद किरमानी हे प्रसिद्ध विकेटकीपर आहेत. त्यांनी '८३' वर्ल्डकपमध्ये महत्त्वाची भूमिका बजावली होती. साहिल टीव्हीवरील प्रसिद्ध चेहरा आहे.
या सिनेमात क्रिकेटर श्रीकांतची भूमिका विजय देवरकोंडा साकारणार होता. मात्र र विजयने ही भूमिका साकारण्यास नकार दिला आहे. सध्या तो आपल्या तेलुगू सिनेमच्या प्रोजेक्टसमध्ये बिझी आहे.
१९८३ मध्ये कपिल देव यांच्या नेतृत्वाखाली भारतीय क्रिकेट टीमने विश्वचषक जिंकला; तो क्षण आजही क्रिकेटप्रेमींच्या मनात जिवंत आहे. ८३' बाबत बोलायचे झाले तर हा सिनेमा १० एप्रिल, २०२० मध्ये प्रदर्शित होणार आहे. लवकरच रणवीर या सिनेमासाठी कपिल देव यांच्याकडून क्रिकेटचे धडे गिरवणार आहे. या सिनेमाचे दिग्दर्शन कबीर खान करणार आहे. रणवीर सिंगने फारच कमी कालावधीमध्ये चित्रपटांमध्ये अभिनयाची जोरदार बॅटिंग केली असून आता '८३' सिनेमामध्ये काय कमाल दाखवणार हे पाहणे औत्सुकतेचे ठरणार आहे.