काबिल चित्रपटाने केला बॉक्सआॅफीसवर १०० कोटीचा टप्पा पार
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2017 15:19 IST2017-02-05T09:49:26+5:302017-02-05T15:19:26+5:30
काबील या चित्रपटाने फार कमी कालावधीत बॉक्स आॅफीसवर शंभर कोटीचा टप्पा पार केला आहे. या चित्रपटाच्या स्पर्धेत बॉलिवुडचा तगडा ...
.jpg)
काबिल चित्रपटाने केला बॉक्सआॅफीसवर १०० कोटीचा टप्पा पार
क बील या चित्रपटाने फार कमी कालावधीत बॉक्स आॅफीसवर शंभर कोटीचा टप्पा पार केला आहे. या चित्रपटाच्या स्पर्धेत बॉलिवुडचा तगडा कलाकार शाहरूख खानचा रईस हा चित्रपट असताना ही या चित्रपटाला मिळालेले हे यश नक्कीच नजरेत भरण्यासारखे आहे. या चित्रपटातील
हृतिक रोशन आणि यामी गौतमी या दोन कलाकारांच्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले आहे. त्यामुळे या चित्रपटाने अकराव्या दिवशीदेखील १०६.२ कोटी इतकी कमाई केली आहे. या चित्रपटाने शनिवारी ९.२२ कोटी इतकी कमाई केली.
काबिल आणि रईस हे दोन्ही चित्रपट २५ जानेवारीला एकाच दिवशी प्रदर्शित झाले होते. रईस चित्रपटाने कमाईच्या बाबतीत बॉक्स आॅफिसवर धमाकेदार सुरुवात केली. या चित्रपटाच्या तुलनेत काबिलची कमाई कमी होती. सुरुवातीला दोन्ही चित्रपटांनी जवळपास ३५ ते ४० कोटीची कमाई केली होती. त्यानंतर आता पहिल्या आठवड्याच्या अखेरीस दोन्ही चित्रपटाच्या कमाईचा विचार केल्यास काबिलह्ण चित्रपटाने शुक्रवारी २ फेब्रुवारीला ५.२५ कोटी आणि शनिवारी ६.४० कोटींची कमाई केली. तर याच दोन दिवसांत रईसने या चित्रपटापेक्षा अधिक म्हणजे ६.२५ कोटी आणि ६.६० कोटी गल्ला जमविल्याचे दिसते.
हृतिक रोशनचा काबिल हा चित्रपट शाहरुखच्या चित्रपटाला टक्कर देण्याचा प्रयत्न करत आहे. शांततेत आयुष्य जगू इच्छिणा-या जोडप्याच्या आयुष्यात अचानक वादळ येते आणि या जोडप्याचे जगचं उध्वस्त करून जाते. येथून सुरू होते, एका सूडाची कहानी. हृतिक रोशने काबिलमध्ये साकारलेल्या रोहन भटनागरच्या भूमिकेचे प्रचंड कौतुक होत आहे. हृतिकने नेहमीच बॉलिवुडला अनेक सुपरहीट चित्रपट दिले आहेत. आता, यामध्ये काबील या चित्रपटाचा ही समावेश झाला आहे असे म्हणण्यास हरकत नाही.