Athiya K L Rahul Wedding : अथिया आणि के एल राहुलच्या घरी लगीनघाई, विद्युत रोषणाईने सजलं राहुलचं घर

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 18, 2023 09:36 IST2023-01-18T09:32:14+5:302023-01-18T09:36:38+5:30

अभिनेत्री अथिया शेट्टी आणि भारतीय क्रिकेटपटू केएल राहुल यांच्या लग्नाची तयारी सुरु झाली आहे

k l rahul and athiya shetty wedding preparation started rahul home in bandra lightened up | Athiya K L Rahul Wedding : अथिया आणि के एल राहुलच्या घरी लगीनघाई, विद्युत रोषणाईने सजलं राहुलचं घर

Athiya K L Rahul Wedding : अथिया आणि के एल राहुलच्या घरी लगीनघाई, विद्युत रोषणाईने सजलं राहुलचं घर

Athiya K L Rahul Wedding :  बॉलिवूड आणि क्रिकेटरची आणखी एक जोडी लग्नबंधनात अडकत आहे. अभिनेत्री अथिया शेट्टी आणि भारतीय क्रिकेटपटू केएल राहुल यांच्या लग्नाची तयारी सुरु झाली आहे. खंडाळा येथील एका फार्म हाऊसमध्ये हे लग्न थाटामाटात होणार आहे. सध्या दोघांच्या घरी लग्नाची लगबग दिसून येतेय.

के एल राहुल याचे बांद्रा पाली हिल येथईल घर विद्युत रोषणाईने सजले आहे. पाली हिल येथील संधू पॅलेस येथे सजावट करण्यात आली आहे. सगळीकडे झगमगाट आहे. येत्या २३ तारखेला हा लग्नसोहळा पार पडणार आहे. मात्र दोघांकडूनही अद्याप अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. मीडिया रिपोर्ट्सनुसार दोघांच्या लग्नाच्या तयारीला सुरुवात झाली आहे. 

२१ जानेवारीपासून हळद, संगीत आणि मेहंदी हे फंक्शन्स सुरु होतील. यासाठी बॉलिवूडचा अण्णा सुनील शेट्टीचा खंडाळा येथील बंगला सज्ज आहे. इथेच हा शाहीविवाहसोहळा पार पडणार आहे. आथिया आणि राहुल गेल्या ४ वर्षांपासून एकमेकांना डेट करत आहेत. दोघेही एकमेकांसोबत सोशल मीडियावर फोटो शेअर करत असतात. 

Web Title: k l rahul and athiya shetty wedding preparation started rahul home in bandra lightened up