कियारा आडवाणी एक हिटच्या शोधात

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 15, 2017 17:18 IST2017-05-15T11:48:19+5:302017-05-15T17:18:19+5:30

कियारा आडवाणी नुकतीच निर्माता रॉबी ग्रेवाल यांच्या ऑफिसच्या बाहेर नव्या लूकमध्ये दिसली होती. यावरुन अशी चर्चा सुरु आहे की ...

K. Advani searches for a hit | कियारा आडवाणी एक हिटच्या शोधात

कियारा आडवाणी एक हिटच्या शोधात

यारा आडवाणी नुकतीच निर्माता रॉबी ग्रेवाल यांच्या ऑफिसच्या बाहेर नव्या लूकमध्ये दिसली होती. यावरुन अशी चर्चा सुरु आहे की कियारा लवकरच रॉबीच्या आगामी चित्रपटात दिसणार आहे. 
रॉबी ग्रेवाल आपल्या आगामी चित्रपटासाठी अभिनेत्रीच्या शोधात आहे. कियाराला भेटल्यानंतर कदाचित त्याचा शोध संपला असेल. याचित्रपटात दिशा पटानीचे नावदेखील चर्चेत आहे. 
कियाराने संजय लीला भंसाली यांच्यासोबत तीन चित्रपट साइन केल्याचे समजते आहे. पण याबाबत अजून कोणतीही कंन्फर्मेशन आलेले नाही. भंसाळी कियाराला शाहिद कपूरसोबत ट्यूजडे एंज फ्राइडेमध्ये साईन करु शकतात. 
कियाराने फगली या चित्रपटाव्दारे या क्षेत्रात पदार्पण केले आहे. धोनी द अनटोल्ड स्टोरी या चित्रपटात सुशांत सिंह राजपूतसोबत दिसली होती. 
सध्याच्या अभिनेत्रींच्या लिस्टमध्ये कियाराचे नाव सगळ्यात वरती दिसते आहे. 2009मध्ये आलेल्या आमीर खानचा 3 इडियट्स चित्रपट पाहून कियाराला तिच्या वडिलांनी अभिनय करायला परवानगी दिली होती. धोनी द अनटोल्ड स्टोरी हा चित्रपट सोडला तर कियाराच्या चित्रपटाना बॉक्स ऑफिसवर फारसे यश मिळालेले नाही आहे. नुकताच आलेला तिचा मशीन हा चित्रपट फ्लॉप झाला होता. सध्या कियारा एक सुपरहिट चित्रपटाच्या शोधात आहे. 

Web Title: K. Advani searches for a hit

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.