जस्टीन बीबर करण जोहरसोबत घेणार का ‘कॉफी’?
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2017 13:01 IST2017-05-08T07:31:57+5:302017-05-08T13:01:57+5:30
कॅनडियन सिंगर जस्टीन बीबर लवकरच पर्पस वर्ल्ड टूरनिमित्त भारतात येतो आहे. जस्टीनची टीम मुंबईत पोहोचली आहे. येत्या १० मे ...

जस्टीन बीबर करण जोहरसोबत घेणार का ‘कॉफी’?
क नडियन सिंगर जस्टीन बीबर लवकरच पर्पस वर्ल्ड टूरनिमित्त भारतात येतो आहे. जस्टीनची टीम मुंबईत पोहोचली आहे. येत्या १० मे रोजी मुंबईत जस्टीनचा लाईव्ह कॉन्सर्ट रंगणार आहे. पण बातमी ही नाही तर बातमी वेगळीच आहे. होय, जस्टीनचा लाईव्ह शो तर तुम्हाला एन्जॉय करता येणार आहेच. पण त्याशिवाय जस्टीन एका सेलिब्रिटी चॅट शोमध्येही दिसण्याची शक्यता आहे. होय, करण जोहरच्या ‘कॉफी विद करण’मध्ये जस्टीन बीबर दिसू शकतो. तूर्तास या बातमीला अधिकृत दुजोरा मिळू शकलेला नाही. पण सध्या या बातमीची जोरदार चर्चा आहे.
करणच्या सेलिब्रिटी चॅट शोमध्ये आत्तापर्यंत अमिताभपासून शाहरूख खान, दीपिका पादुकोणपासून प्रियांका चोप्रापर्यंत अनेक सेलिब्रिटी सहभागी झाल्या आहे. या शोमध्ये करण एका वेगळ्याच अंदाजात सेलिब्रिटींना बोलते करतो. त्याच्या याच शोची मग दुसºया दिवशी हेडिंग बनते. याच करणच्या शोमध्ये जस्टीन बीबर दिसण्याची शक्यता आहे. असे झाले तर एक आंतरराष्ट्रीय पॉप सिंग एका भारतीय चॅट शोमध्ये सहभागी झाल्याचे आपल्याला प्रथमच पाहायला मिळेल. बीबरच्या भारतीय चाहत्यांसाठी यापेक्षा आनंदाची बातमी काय असू शकेल.
ALSO READ : सनी लिओनीने जस्टीन बीबरकडे केली ‘ही’ गोड मागणी!
भारतातही बीबरचे असंख्य चाहते आहेत. त्याची प्रचंड क्रेझ आहे. ‘बेबी’ गाण्यामुळे प्रकाश झोतात आलेल्या जस्टीनने वयाच्या केवळ २२ व्या वर्षी ड्रेक, द विकेंड, एडेल यासारख्या दिग्गज कलावंतांना मागे टाकले. जस्टीन त्याच्या खासगी जीवनातील अफेयर्समुळेदेखील नेहमीच चर्चेत असतो. तसेच तो विलासी व सुखवस्तू जीवनशैलीसाठी तो ओळखला जातो. गेल्या वर्षी त्याने दिलखुलास पार्टी करण्यासाठी लंडनमध्ये एक आलिशान घर किरायाने घेतले आहे.