‘अॅट्रॉसिटी’ने जमवली पूजा-ऋषभची जोडी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2018 17:15 IST2018-02-13T11:45:39+5:302018-02-13T17:15:39+5:30

चंदेरी दुनियेत नवनवीन कलाकारांची एंट्री होत असते. यापैकीच काही स्वतंत्रपणे तर काही जोडीच्या रूपातही लोकप्रिय होतात.‘अॅट्रॉसिटी’ या आगामी मराठी ...

Junkey Pooja-Rishabhachi Junkey Junkey collected by 'Atrocity' | ‘अॅट्रॉसिटी’ने जमवली पूजा-ऋषभची जोडी

‘अॅट्रॉसिटी’ने जमवली पूजा-ऋषभची जोडी

देरी दुनियेत नवनवीन कलाकारांची एंट्री होत असते. यापैकीच काही स्वतंत्रपणे तर काही जोडीच्या रूपातही लोकप्रिय होतात.‘अॅट्रॉसिटी’ या आगामी मराठी सिनेमाने अशाच दोन नवीन कलाकारांची जोडी जमवली आहे.या चित्रपटाद्वारे पूजा जैस्वाल आणि ऋषभ पडोळे हे दोन युवा चेहरे मुख्य भूमिकेद्वारे चंदेरी दुनियेत आपलं नशीब आजमावण्यासाठी सज्ज झाले आहेत. डॉ. राजेंद्र पडोळे यांची निर्मिती आणि संकल्पना असलेल्या या चित्रपटाची निर्मिती आर. पी. प्रोडक्शनच्या बॅनरखाली करण्यात आली आहे. हा चित्रपट २३ फेब्रुवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.


या चित्रपटातील सई कांबळे आणि ऋषभ मोहिते या मुख्य व्यक्तिरेखा साकारण्यासाठी फ्रेश चेहऱ्यांची गरज होती.दिग्दर्शक दीपक कदम आणि निर्माते डॉ. राजेंद्र पडोळे यांनी पूजा जैसवाल आणि ऋषभ पडोळे यांची ऑडीशनच्या माध्यमातून मुख्य भूमिकेसाठी निवड केली.दोघांसाठीही मोठा पडदा नवीन असला तरी कॅमेरा फेस करण्यासाठी लागणारं धाडस होतं आणि त्या बळावरच आपल्यातील कलाकार पडद्यावर यशस्वीपणे सादर केल्याचं दीपक कदम म्हणतात.पहिलाच चित्रपट असूनही दोघांची ऑनस्क्रीन केमिस्ट्री खूप छान जुळली आहे. एकमेकांना समजून घेत दोघांनीही
आपापल्या व्यक्तिरेखांमध्ये जीव ओतला आहे. पूजाइतकाच मी देखल नवखा असलो तरी आमचं ‘गिव्ह अँड टेक’ खूप चांगलं झाल्याने दोघेही आपल्या व्यक्तिरेखांना न्याय देऊ शकल्याचं ऋषभ म्हणाला. पहिल्या चित्रपटाचा अनुभव शेअर करताना पूजा म्हणाली की, रुपेरी पडद्यावर जेव्हा एखादी नवीन जोडी येते, तेव्हा सर्वांनाच उत्सुकता असते.कलाकारांनाही प्रेक्षकांइतकीच उत्सुकता असते. दीपक सर आणि ‘अॅट्रॉसिटी’च्या संपूर्ण टिमच्या साथीने आम्ही आमचं काम चोख बजावलं आहे.आता उत्सुकता आहे प्रेक्षकांच्या प्रतिक्रियांची...

पूजा आणि ऋषभ या नवोदित जोडीच्या साथीला या चित्रपटात निखिल चव्हाण, यतिन कार्येकर,लेखा राणे, गणेश यादव,विजय कदम, सुरेखा कुडची, डॉ. निशिगंधा वाड, कमलेश सुर्वे, राजू मोरे, ज्योती पाटील, शैलेश धनावडे आदि कलाकारांनी विविध व्यक्तिरेखा साकारल्या आहेत. राजन सुर्वे आणि मंगेश केदार यांनी या चित्रपटाची पटकथा आणि संवाद लिहिले आहेत.गीतकार अनंत जाधव, मंदार चोळकर, अखिल जोशी, विजय के. पाटील यांनी लिहिलेल्या गीतांना संगीतकार अमर रामलक्ष्मण यांनी स्वरसाज चढवला आहे. २३ फेब्रुवारीला संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटाचं कला दिग्दर्शन मधु कांबळे यांनी केलं असून,राजेश सोमनाथ यांनी छायांकन केलं आहे.

Web Title: Junkey Pooja-Rishabhachi Junkey Junkey collected by 'Atrocity'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.