/>‘जंगल जंगल बात चली है, पता चला है..चड्डी पहनके फूल खिला है, फूल खिला है...’ हे गाणे आवडते. काही वर्षांपूर्वी दूरदर्शनवर येणाºया ‘मोगली’ या अॅनिमेटेड मालिकेतील या शीर्षक गीताने बच्चे कंपनीला अगदी वेड लावले आहे. बच्चे कंपनीच नाही तर अगदी थोरले-मोठेही या मालिकेच्या प्रेमात पडले होते. जंगलांमध्ये प्राण्यांसोबत राहणारा ‘मोगली’ आता रूपेरी पडद्यावर येणार आहे. डिज्नीचा ‘दी जंगल बुक’ हा अॅनिमेटेड चित्रपट हिंदीतही डब केला गेला आहे यात प्रियंका चोपडा, इरफान खान, ओम पुरी व शेफाली शहा या दिग्गजांनी आपला आवाज दिला आहे. विशेष म्हणजे ९० च्या दशकात दूरदर्शनवर प्रसारित होणाºया ‘मोगली’ मालिकेतील ‘शेर खान’ या पात्राला अभिनेता नाना पाटेकर याने आपला आवाज दिला होता. आता या अॅनिमेटेड चित्रपटातही नानानेच ‘शेर खान’ला आवाज दिला आहे. हा चित्रपट १९६७ मध्ये वाल्ट डिज्नीची मूळ अॅनिमेटेड रूपात याच नावाने साकारलेल्या चित्रपटाचा रिमेक आहे. या चित्रपटाच्या इंग्रजी आवृत्तीत बिल मुरे, बेन किंग्सले, इदरिस एल्बा, ल्युपिटा न्योंगओ, स्कारलेट जॉन्सन, क्रिस्टोफर वाल्कन व जियानकार्लो स्पोसितो यांनी आवाज दिला आहे. तर हिंदीतील चित्रपटास प्रियंका, इरफान, शेफाली व ओम पुरींनी आवाज दिला आहे. प्रियंकाने ‘का’या अजगरच्या पात्रास, इरफानने ‘बल्लू’ या अस्वलाच्या पात्रास तर शेफालीने ‘रक्षा’ या लांडग्याच्या पात्रास आवाज दिला आहे. ओम पुरी यांनी ‘बघीरा’नामक काळ्या चित्त्यास आपला आवाज दिला आहे.भारतात येत्या ८ एप्रिलला हा चित्रपट प्रदर्शित होत आहे.