/>‘ग्रेट ग्रँड मस्ती’ आॅनलाईन लीक झाल्याची बातमी धडकली आणि मेकर्सला धडकी भरली. कदाचित याचमुळे ‘ग्रेट ग्रँड मस्ती’ची रिलीज डेट बदलण्यात आली आहे. आधी हा चित्रपट २२ जुलैला रिलीज होणार होता. पण आता हा चित्रपट येत्या शुक्रवारीच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. रिलीज डेटच्या १७ दिवसांपूर्वीच लीक झाल्याने बॉक्सआॅफिसवर ‘ग्रेट ग्रँड मस्ती’ला मोठा फटका बसण्याची शक्यता होती. हा धोका टाळण्यासाठीच कदाचित ‘ग्रेट ग्रँड मस्ती’ लवकर रिलीज करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यापूर्वी शाहिद कपूरचा ‘उडता पंजाब’ही लीक झाला होता. मात्र सेन्सॉर बोर्डासोबतच्या वादामुळे हा चित्रपट इतका चर्चेत आला होता की, लीक झाल्यानंतरही बॉक्स आॅफिसवर त्याला चांगली ओपनिंग मिळाली. ‘सुल्तान’ही रिलीज व्हायला एक दिवस आधी रिलीज झाल्याची बातमी आली..पण ‘सुल्तान’ची बात काही वेगळी होती. सेक्स कॉमेडी असलेल्या ‘ग्रेट ग्रँड मस्ती’ची बात जरा निराळी आहे..