​रंगूनमधील ‘जुलिया’ पोहचली कोर्टात?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2017 19:08 IST2017-02-18T13:35:45+5:302017-02-18T19:08:54+5:30

विशाल भारद्वाज दिग्दर्शित ‘रंगून’ या बहुचर्चित चित्रपटात कंगना राणौतने साकारलेली भूमिका मिस जुलिया कायद्याच्या कचाट्यात सापडण्याची शक्यता निर्माण झाली ...

'Julia' in Rangoon reached the court? | ​रंगूनमधील ‘जुलिया’ पोहचली कोर्टात?

​रंगूनमधील ‘जुलिया’ पोहचली कोर्टात?

शाल भारद्वाज दिग्दर्शित ‘रंगून’ या बहुचर्चित चित्रपटात कंगना राणौतने साकारलेली भूमिका मिस जुलिया कायद्याच्या कचाट्यात सापडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. रंगून मधील मिस जुलिया या भूमिकेवर कॉपीराईट उल्लंघनाचा ठपका ठेवण्यात आला असून अशी भूमिका प्रेक्षकांसमोर दाखविण्याचा अधिकार केवळ वाडिया मुव्हीटोन या कंपनीला असल्याचा दावा करण्यात आला आहे. 

विशाल भारद्वाज दिग्दर्शित ‘रंगून’ या चित्रपटात कंगना राणौत, सैफ अली खान व शाहिद कपूर यांच्या प्रमुख भूमिका आहेत. विशेष म्हणजे या चित्रपटात कंगना राणौत साकारत असलेली भूमिका मिस जुलिया हिचा अंदाज ४० च्या दशकातील अभिनेत्री नादिया हिच्यासारखा असल्याने हा वाद निर्माण झाला आहे. वाडिया मुव्हीटोन यांनी विशाल भारद्वाज यांच्यावर कॉपीराईट कायद्याचे उल्लंघन केल्याचा आरोप करीत याविरोधात मुंबई उच्च न्यायालयात खटला दाखल केला आहे. 



चित्रपट निर्मिती कंपनी वाडिया मुव्हीटोनच्यावतीने रॉय वाडिया यांनी केलेल्या आरोपानुसार, रंगून मधील मिस जुलिया ही भूमिका आॅस्ट्रेलियन स्टंट अभिनेत्री मेरी इव्हान्स हिच्यावर आधारित आहे. मेरी इव्हान्स हिने फिअरलेस नादिया ही भूमिका रंगविली होती. भारतासह जगभरात ही भूमिका सर्वाधिक प्रसिद्ध भूमिकेत सामील आहे. वाडिया यांनी केलेल्या दाव्यानुसार मिस जुलियासाठी वापरण्यात आलेल्या सर्व गोष्टी या फिअरलेस नादियाशी संबधित आहेत. ‘ब्लडी हेल’ हे वाक्य देखील वापरणे हे कॉपीराईट कायद्याचे उल्लंघन आहे. रंगून मध्ये ब्लडी हेल हे गीत गात कंगना सैनिकांचे मनोरंजन करताना दिसते आहे. 
 


वाडिया मुव्हीटोन प्रायव्हेट लिमिटेडचे प्रमुख रॉय वाडिया यांनी या प्रकाराला विश्वासघात म्हंटले आहे. २००६ मध्ये नादियावर चित्रपट तयार करण्यासाठी यूटीव्हीचे रॉनी स्क्रू वालाने संपर्क साधला होता. यावर कोणतेही काम झाले नाही. मात्र विशाल भारद्वाज यांनी यूटीव्हीसाठी नादियासारखेच पात्र ठेऊन चित्रपट तयार केला. 

विशाल भारद्वाज व यूटीव्हीने याचा इन्कार केला असून, ‘रंगून’ या नावापूर्वीच्या ‘जुलिया’ या नावाशी व या चित्रपटातील पात्र ‘फिअरलेस नादिया’पासून प्रेरित नाही. आम्हाला नादिया पात्राशी संबधित असलेला चित्रपट स्थगित केला असल्याचे सांगण्यात आले. वाडिया यांनी एका जर्मन कंपनीशी करार केला असून ते फिअरलेस नादियाची सामुग्री वापरू शकतात. 

Web Title: 'Julia' in Rangoon reached the court?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.