क...क...किरण..तुम बूढी हो गई हो...! जुही चावलाने शेअर केला ‘नो मेकअप लूक’मधील फोटो, झाली ट्रोल
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 30, 2021 18:29 IST2021-05-30T18:25:49+5:302021-05-30T18:29:44+5:30
Juhi Chawla : आपल्या इन्स्टा अकाऊंटवर जुहीने हा सेल्फी शेअर केला. यात ती बाल्कनीत उभी दिसतेय.

क...क...किरण..तुम बूढी हो गई हो...! जुही चावलाने शेअर केला ‘नो मेकअप लूक’मधील फोटो, झाली ट्रोल
बॉलिवूड अभिनेत्री जुही चावला (Juhi Chawla) भलेही चित्रपटांपासून दूर आहे, पण सोशल मीडियावर प्रचंड अॅक्टिव्ह आहे. जुही सतत स्वत:चे फोटो व व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत असते. आता जुहीने काय केले तर तर नो मेकअप सेल्फी. पण हे काय, हा सेल्फी शेअर केला अन् जुही भलतीच ट्रोल झाली. (Juhi Chawla trolled after no makeup look selfie)
आपल्या इन्स्टा अकाऊंटवर जुहीने हा सेल्फी शेअर केला. यात ती बाल्कनीत उभी दिसतेय. पलीकडे अथांग समुद्र आहे आणि सूर्यास्ताचा सुंदर नजारा आहे.
जुहीचा हा सेल्फी तिच्या अनेक चाहत्यांना आवडला. पण काहींनी मात्र हा सेल्फी पाहून जुहीला ट्रोलही केले.
‘किरण तुम बुढी हो गई हो, लेकिन तुम हां करो या ना, तुम सिर्फ मेरी हो,’ असे एका युजरने तिच्या या सेल्फीवर कमेंट करताना लिहिले. अन्य एका युजरने, क्या से क्या हो गया देखते देखते, अशा शब्दांत जुहीची खिल्ली उडवली आहे.
जुही मी खोटं बोलणार नाही, पण तो सूर्यास्त खरोखर सुंदर आहे, अशी कमेंट एका चाहत्याने केली आहे. अर्थात अनेकांनी तिचे कौतुकही केले. जुहीच्या चेह-यावरचे हास्य अजूनही वेडं लावते, अशा कमेंट्सही काही चाहत्यांनी केल्या आहेत.
तुम्हाला माहित आहेच की, जुही चावला ‘मिस इंडिया’ राहिली आहे. 1984 साली तिने मिस इंडियाचा किताब जिंकला होता. यानंतर दोन वर्षांनी तिने ‘सल्तनत’ या सिनेमातून बॉलिवूड डेब्यू केला होता. ‘कयामत से कयामत तक’ या सिनेमाने जुहीना नाव आणि लोकप्रियता दोन्हीही मिळवून दिले. यानंतर तिने कधीच मागे वळून बघितले नाही. आपल्या करिअरमध्ये एकापेक्षा एक हिट सिनेमे देणा-या जुहीने 1997 साली बिझनेसमॅन जय मेहतासोबत लग्नगाठ बांधली. तिला जान्हवी व अर्जुन अशी दोन मुले आहेत. 2017 साली ‘द टेस्ट केस’ या वेबसीरिजमध्ये ती अखेरची झळकली होती.