​ जुही चावला हिला उषा-वैभव पुरस्कार

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2017 10:39 IST2017-03-12T05:09:47+5:302017-03-12T10:39:47+5:30

जुही चावला हिचे नाव घेताच डोळ्यासमोर उभा राहतो तो तिचा हसरा चेहरा . सध्या जुही सिनेमांत सक्रिय नसली तरी ...

Juhi Chawla Hila Usha-Vaibhav Award | ​ जुही चावला हिला उषा-वैभव पुरस्कार

​ जुही चावला हिला उषा-वैभव पुरस्कार

ही चावला हिचे नाव घेताच डोळ्यासमोर उभा राहतो तो तिचा हसरा चेहरा . सध्या जुही सिनेमांत सक्रिय नसली तरी तिने बॉलिवूडमध्ये स्वत:ची वेगळी ओळख निर्माण करून ठेवली आहे. थोडीशी खट्याळ, काहीशी अल्लड अशी अभिनेत्री म्हणजे जुही चावला. सुमधूर हास्याने आणि दमदार अभिनयाने प्रेक्षकांना भुरळ पाडणाºया जुही चावला हिला अलीकडे विद्यावैभव प्रकाशनच्या उषा-वैभव पुरस्काराने गौरविण्यात आले. राज्यपाल विद्यासागर राव यांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला. यावेळी जुही नारंगी रंगाच्या सूटमध्ये दिसली.



अभिनयासोबतच अनेक सामाजिक उपक्रमात जुहीचा सहभाग राहिला आहे. किरणोत्सारी पदार्थ शिवाय प्लास्टिक वापराविरोधी अभिनयात जुहीने विशेष सहभाग नोंदवलाय.
१९८४ मध्ये ‘मिस इंडिया’ स्पर्धा जिंकल्यानंतर जुहीने अभिनय करण्याचे ठरविले. त्यानंतर १९८६ सालच्या ‘सल्तनत’ या चित्रपटामधून तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. नंतर १९८८ साली आलेला ‘कयामत से कयामत तक’ हा तिचा दुसरा चित्रपट प्रचंड लोकप्रिय ठरला होता. या चित्रपटातील आमिर खान आणि जुहीच्या जोडीला प्रेक्षकांनी पसंती दर्शविली होती. त्यानंतर ‘बोल राधा बोल’, ‘राधा का संगम’, ‘राजू बन गया जंटलमन’,‘मेरे सजना साथ निभाना’, ‘दौलत की जंग’, ‘शतरंज’, ‘आईना’ यांसारख्या चित्रपटांत जुहीने अभिनय केला आहे. तर शाहरूख खानबरोबरचे ‘येस बॉस’, ‘फिर भी दिल है हिंदुस्तानी’, ‘डुप्लिकेट’ या चित्रपटांतील तसेच अलीकडच्या काळातील ‘गुलाब गँग’,‘सन आॅफ सरदार’ यांसारख्या अनेक चित्रपटांतील जुहीच्या अभिनयाची प्रशंसा झाली आहे. जुहीने हिंदीखेरीज तेलुगू, तमिळ इत्यादी भाषांमधील चित्रपटांतही अभिनय केला आहे. 
  

Web Title: Juhi Chawla Hila Usha-Vaibhav Award

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.